Type Here to Get Search Results !

बलशाली ह्र्दय संमेलन ...........!


बलशाली ह्र्दय संमेलन ...........! 

आजूबाजूला प्रदूषण खूप वाढले आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यातही नद्या आणि माती याचे प्रदूषण सर्वात जास्त होत आहे. . वने कमी होत आहेत.  झाडे कमी होत आहेत. अशी सगळी परस्थिती वातावरणाची आहे. पण सर्वात गंभीर बाब म्हणजे माणसाच्या  विचारांचे प्रदूषण देखील वाढत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण पिढी चंगळ वादाकडे झेपावत आहे. आज कोणाला कोणाचे मार्गदर्शन नकोय . कोणाला कोणाचे सुविचार नको आहेत. कमी वेळात जास्त पैसा देणारा मार्ग शोधणे सुरु आहे. अशा वेळी सध्या आजूबाजूला जे सुरु आहे त्यावर फार भाष्य करणे आवश्यक वाटत नाही. 
 मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे.  पण अशा सर्व प्रदूषणात पान निवळी सारखे काम करणारे खूप महत्वाचे ठरतात.संपूर्ण जग बदलत येत नसले तरी आजूबाजूला काम करत लोकांना बदलता येते. त्यांना नवा विचार देत येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेली बारा वर्षापासून कराड येथील डोंगराच्या कुशीत भरवण्यात येणारे  " बलशाली ह्र्दय संमेलन"  तरुणांना नवी दिशा नवा विचार देत आहे. 
मा. इंद्रजीत देशमुख आजच्या तरुणानाचे  प्रेरणा स्थान बनले आहेत. चांगले विचार देत नवी पिढी घडवण्याचे काम  आज देशमुख साहेब करत  आहेत. सर्वसामान्य तरुणांच्या डोळ्यात नवी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. डोक्यात बलशाली विचार आणि ह्रदयात संवेदनशीलता समाजाविषयीचे प्रेम जागे करण्याचा हा प्रयत्न खुप मोलाचा आणि महत्वपूर्ण आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची परंपरा शिवमच्या माध्यमातून  तरुणांना मिळत आहे. हेच तरुण पुढे नव्या  पिढीचे प्रमुख स्तंभ होणार आहेत. जगात भारताचे नाव वृद्धिंगत करणार आहेत. आत्मविश्वास आणि प्रचंड देशाभिमान हे आजच्या तरुणांच्या डोळ्यात आणि मनगटात भरण्याचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
स्वामी विवेकानंद याच्या जयंतीला हा विवेकाचा विचारांचा जागर सुरु होतो. आज या जागराला एक तप पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील हजारो तरुण यात सहभागी होताना दिसत आहे. शिस्त, देशप्रेम,  याचा अनोखा संगम या ठिकाणी पहावयास मिळतो. जाती धर्माच्या भिंती पाडून लोक एकमेकांना आलिंगन देतात. आपले ह्र्दय  बलशाली करण्याचा हा सोहळा ह्रदयात कोरून ठेवावा असाच आहे. 
या ह्र्द्यीचे त्या ह्रदयी देताना  प्रेम, सद्भावना, सुविचार, दिल्याशिवाय माणसाचे ह्र्दय बलशाली होत नाही हेच या सोहळ्यातून दिसून येते. इंद्रजीत देशमुख साहेब यांच्या माध्यमातून भरणारा हा तरुणानचा अविष्कार समाजाला नवी उर्जा देण्यासाठी भविष्यात देखील उपयोगी पडेल .
आज प्रदुषणाचा विळखा वाढत असला तरी एका जगाच्या  कोपऱ्यात सुरु झालेला हा उर्जेचा प्रचंड स्त्रोत जगाला नवा सूर्य देईल यात कोणतीही शंका नाही.

-बिपीन जगताप 
mobile number- ९०११०९१५२४