Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही

मधमाशी शिकव आम्हाला …!

हे मधमाशी शिकव आम्हाला 
एकोप्याने रहायला समूहात जगताना 
समूहाचे नियम पाळायला !

शिकव आम्हाला दीर्घ कष्ट घेतल्याशिवाय 
गोड फळ  मिळत नाही 
थेंब थेंब साठ्ल्याशिवाय मधाचे पोळे होत नाही 

मधमाशी शिकव आम्हाला 
  कमी जागेत घर बांधायला 
निसर्ग नष्ट न करता सुखाने नांदायला 

मधमाशी शेतकर्यांना शिकव आमच्या 
नैसर्गिक शेती करायला 
पिक पाणी फळे फुले प्रेमाने वाढवायला 

मधमाशी तुझा फुलांना होणारा परिस स्पर्श 
पिकांना संजीवनी देऊन जातो 
तुझ्या फक्त येण्याने शिवारात सोन्याचा 
पाऊस पडतो 

मधमाशी तू आदर्श आहेस 
समूहात,कुटुंबात,जगात कसे रहावे
 तूच फक्त शिकवू शकतेस 
म्हणून तुला हे साकडे …!

 पण माफ कर मधमाशी 
 आम्ही तुला मारतो आहे 
 विषारी कीटक नाशके पाजतो आहे 
 मधासाठी तुझे घर जाळतो आहे !
 
आज तुझ महत्व आम्हाला पटणार आहे 
तू नसलीस तर माणसाचे जीवन घटणार आहे 
जगाचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.  
  
                               - बिपीन जगताप