मधमाशी वाचवू या …शेती फुलवू या …!
"ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल त्या नंतर अवघ्या चार वर्ष नंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल"
. - अल्बर्ट आइन्स्टीन ,
. - अल्बर्ट आइन्स्टीन ,
मधमाशी या किटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिस स्पर्शा पेक्षा कमी नसतो.तर फल धारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पती पासून मिळत असले तरिही मधमाशा यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधा सारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व धोक्यात आहे. मधासाठी पोळी जाळणे,विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टोवर उभारणे,मधमाश्या विषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे.यासाठी आपण हे करू शकता
1) मधमाशाचा अधिवास संपू न देणे व त्यांचे संरक्षण करणे.
2) मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन न काढणे
3) विषारी कीटक नाशकांच्या फवारण्या करू नये अथवा अपरिहार्यता असेल तर संध्याकाळी कराव्यात
4) मधमाश्यांचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊन मधमाशा पालन करावे
5) जंगलास वनवा लावू नये अथवा लागल्यास तत्काळ विझवावा
6) शेताच्या आजूबाजूची मधमाश्यांची पोळी काढू नये
7) मधमाश्यांच्या अधिवासात मोबाइल टोवर उभारू नये
8) मधमाश्या विषयी जनजागृती करावी
9) मधमाशांनाउपयुक्त सपुष्प वनस्पतींची लागवड करणे.
10) जंगल तोड न करणे.
मधमाशी अतिशय महत्वाचे काम करते. समूहाने जगत आदर्श जगणे माणसाला शिकवते.दीर्घ कष्ट करत मधासारखा गोड पदार्थ निर्माण करते. आपण सर्वजन मधमाशी वाचवण्याचा पर्यायाने माणूस वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या ...!

- बी.बी जगताप,
संचालक, मध संचनालय,महाबळेश्वर
संचालक, मध संचनालय,महाबळेश्वर
Social Plugin