Type Here to Get Search Results !

स्टँचू आँफ लिबर्टी ...!

प्रसिद्ध पटकथा लेखक गीतकार 'अरविंद जगताप' यांचे स्टँचू आँफ लिबर्टी हे नाटक गाजतय या निमित्ताने त्यांना पाठवलेले पत्र.

स्टँचू आँफ लिबर्टी ...!

प्रिय अरविंद जगताप सर,
काल स्टँचू आँफ लिबर्टी हे सर्वांगसुंदर नाटक पाहीले आणि निशब्ध झालो.
भारताचा प्राचीन इतिहास जातींच्या उतरंडिचा आहे तसाच तो वेळोवेळी ही उतरंड पाडणार्या भारतमातेच्या सैनीकी सुपुत्रांचा  देखील आहे. इथल्या जातीच्या भिंती गदागदा हालवून पाडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला.
राजपूत्र असलेला सिद्धार्थ गौतम या प्रयत्नासाठी गौतम बुद्ध झाला.  त्यानंतर संत बसवेश्वर, संत चोखामेळा ते संत तुकाराम गाडगे महाराज यांच्या पर्यंत ही पंरपंरा पुढे आली आहे. समाजातील जातीयवादाची किड संपवण्यासाठी अनेकांनी आपले जिवन वाहून घेतले यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज डाँ.आंबेडकर यांच्यासह अनेक महामानवांचा प्रमुख समावेश आहे. पण हि उतरंड पडतच नाही का ती पडू दिली जात नाही याचाही विचार व्हावा. उतरंडीतील शेवटच्या मडक्याची इच्छा आहे ही उतरंड पडावी पण प्रत्येक वरच्या मडक्याला ती पडू द्यायची नाहीये आपल्या खाली कोणीतरी आहे याचा आसूरी आनंद त्यामागे असावा.
जागतीकरणामूळे जग जवळ आले आहे. माहिती तंत्रज्ञानाची प्रचंड मोठी क्रांती झाली, आता जग बदलले आहे म्हणून काही बदल होईल असे वाटले होते मात्र उलट जाती धर्माच्या भिंती अजून पक्क्या होत आहेत हे दुर्दैव आहे.ट
 आज भारतातील महापुरुषांना आप आपल्या जातींनी वाटून घेतले आहे. त्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव त्यांचेच अनुयायी कसे करतात हे ज्वलंत उदाहरण आज सगळीकडेच पाहवयास मिळत आहे. आपल्या जातीचा झेंडा खांद्यावर घेऊन तो मिरवताना तिरंगा विसरला जाणार नाही ना याचीही काळजी घ्यावी लागेल.
अनेक भारतमातेच्या पुत्रांना, बुद्धीवंत ज्ञानवंताना जातीच्या चौकटीत बंद करणे समाजासाठी घातकच ठरत असते एक महापुरुष आपले सारे जिवन समाजोद्धारासाठी घालवत असतो आणि त्या सर्व कामाला आपण आपल्यापुरते सिमीत करुन त्या महाविचारांना खुजे करत आहोत.
   सामाजिक माध्यमांवर आज दिडदमडीचे ज्ञान (अज्ञान) असणारेच फुटकळ चर्चा करुन महापुरुषांच्या कर्तृत्वाचा हिशोब मांडत वेळ घालवत आहेत. यापेक्षा अजून काय वाईट असेल. सध्या विचार कमी पण विचारवंत खुप झालेत. दुसऱ्यांनी कसे वागावे हे सांगणारे सुविचार रोज पाठवणारांनी एकदा आपल्याला तपासून पाहीले पाहिजे. देशापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही हे भारतीय म्हणून मनावर आता ठसलेच पाहीजे. देशानंतरच धर्म,जात, आणि सर्वांत शेवटी 'मी' असला पाहीजे.

समता,स्वांतत्रता, बंधुत्वता,या मूल्यांवर भारतदेशाचा उच्च दर्जाच्या पाया रचला गेला आहे त्यामूळेच या देशातील अठरापगड जाती धर्म एकत्र राहत आहेत.
आपण नाटकाच्या प्रत्येक संवादातून प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
त्यामूळेच अत्यंत बौद्धिक विचारांनी भरलेले नाटक उच्च दर्जाचे आहे. प्रत्येक कलाकारांनी साकारलेले पात्रे अप्रतिमच आहेत .
जाती धर्मावर नाटक लिहणे हे समाजासाठी खुपच संवेदनशिल बाब असते पण आपण अत्यंत संवेदनशिलपणे आपल्या लेखनशैलीतून मार्मीक पद्धतीने समाजात असलेल्या  जातीवाद्यांना नाटकातून दिलेले उत्तर म्हणजे आपल्या विचारांचा प्रामाणिक उद्देश आणि प्रगल्भता दाखवून देते.
जातीच्या भिंती तोडून सर्वच महापुरुषांना बंधमुक्त करण्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी सुरु असलेल्या आपल्या प्रयत्नांना नक्की यश लाभेल.
सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणित जाती धर्माच्या नव्याने सिंमेटंच्या भिंती उभ्या राहत आहेत. प्रत्येकाला आपआपल्या जातीचा अभिमान अहंकार झाला आहे. आजची सकाळही 'धम्म सकाळ, राम सकाळ,शिवसकाळ म्हणून उगवते आहे.इथले रंगही जातींच्या नावावर नोंद झालेत. महापूरुषांना जाती जातीत वाटून घेतले आहे.अजून काही वर्षांनी  या देशात आता माणूस उरला नाही.. भारत मातेचा सुपुत्र शोधावा लागू नये.
या वरील कलुषित वातावरणात आपण आणलेले स्टँचू आँफ लिबर्टी हे नाटक माणसांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास आहे.
महापुरुषांच्या भव्य दिव्य विचारांचा वारसा चालवण्यासाठी आपल्या सारखे लेखक आहेत ..माणसं आहेत ..हे ... ही नसे थोडके...!
या नाटकाला आपण बोलवले आणि आपल्या विचारांचा पाईक होण्याची संधी दिलीत आपला मनपुर्वक आभारी आहे. भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आपले नाटक मार्गदर्शक ठरेल.
धन्यवाद...!

- बिपीन जगाताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.