Type Here to Get Search Results !

आनंदाची आठवण.


मनाची साठवण ....!
आनंदाची आठवण...!

दिवस महिने वर्ष सहज सरून जातात
मनात आठवणीच्या मात्र रेघा ओढतात !
किती करावी साठवण गेलेल्या काळाची
किती करावी आठवण आनंदी क्षणाची !
कधी कधी मन बालपणात शिरते
आनंदाच्या झाडाला मिठी मारून येते !
मन असे आनंदाने होते नाचत गात
दुखाच्या क्षणावर केली हसत त्याने मात !
काळ असा पुढे रोज सरकत जाणारा
वर्तमानाला भूतकाळात लोटून देणारा !
पण मग सगळच खूप आठवत राहते
मनाच्या कप्प्यातून सहज बाहेर पडते !
अनेक जखमा काळजाच्या अलगद उसवतात
मनाला पुन्हा एकदा घायाळ करून सोडतात !
पण आपण ठरवायचे काय आठवायचे
जीवनातील आनंदी दिवस पुन्हा जगायचे
दिवस महिने वर्ष पुढे सरकतात
काही सुखाचे क्षण पुन्हा घेऊन येतात !
-
                                 -- बिपीन जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.