Type Here to Get Search Results !

हसू नका


मोठ्याने हसू नका....प्रतिष्ठा जपा..!

माणस खोटी प्रतिष्टा खूप जपतात
माणसातून उठून बाजूला बसतात !
स्वताला ते खूप मोठे समजतात
मनमोकळे मात्र जगणेच विसरतात !
हसताना देखील ते मिशितच हसतील
कदाचित त्यांचे दात दिसत असतील !
पण नाही हा देखील प्रतिष्टेचा मामला
त्यांच्याच मुर्दू भाषेतून तो मलाही गमला !
मोठ्याने निर्मळ हसणे नाही हो जमणार
गालातल्या गालातच आम्ही प्रतिसाद देणार !
पण यांच्या प्रतीष्टेला जुमानतो कोण ?
अरे असले घेतो आम्ही रुपयाला दोन !
खर तर माणसच आहेत ना सारी
मग कोण असतो हो कुणाच्या घरी !
तरी पण यांच्या या खोट्या प्रतीष्टेपाई
माणसांच्या माणूसपनाचीच हानी होई !
प्रतिष्टा, श्रीमंती माणसापासून तोडते का ?
खरी सुख दुख वाटून घ्यायला आड येते का ?
मग आम्ही झोपडीतलेच गरीब चांगले आहोत
माणूस म्हणून किमान खरेपनाणे जगतो आहोत !
                                --- बिपीन जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.