मोठ सपान ....!
यंदा पावसाने पडायला पायजे
रानातल पिक उगवाया पायजे !
सावकाराच कर्ज द्यावाच लागलं
काळ्या रानात पिकवावच लागलं !
सकाळ पास्न रानात बसतुय
आभाळाकड डोळ लावून जगतुय !
रोजच काळ्या रानात राबतू
काम कष्ट करून घाम गाळतू !
तरी नशिबाला कशी गरिबी आली
कोणच कसा नाय आमचा वाली !
पण यंदा दगडाला बी पाझर फुटलं
काळ्या ढगातून धो धो पाणी सुटलं !
कधीतरी आम्ह्ची बी पोर शिकत्याल
सायेब होऊन शेतकऱ्याला सुखी करत्याल !
एवढ मोठ सपान बघायचं
आन दिस पुढ ढकलायचं !
--- बिपीन जगताप