Type Here to Get Search Results !

मराठी पाऊल.....!


 मराठी पाऊल पडती पुढे.....!


सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांचा मुलुख हा वेगळा 
मराठी रयतेचा माझा महाराष्ट्र  सगळा !
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अन तुकोबांची गाथा
अध्यात्म क्रांती पुढे टेकला पंडितांचा माथा  !
इथे जन्मले शिवबा अन दिली एक ललकारी 
मुघलांच्या जाचातून केली रयत सुखी सारी !
सावित्री आणि जोतीबांची क्रांती इथेच घडली 
जातीपातीची विषवल्ली मुळातून उखडली !
ज्ञानाची गंगा त्यांनी घरोघरी आणली 
स्त्रिया आणि दलितांची तहान भागवली !
शाहू फुले आंबेडकरांचे स्वप्न होई साकार 
समता आणि बंधुत्वाचा होईल जयजयकार !
ग्रामगीतेतून बोध केला  निर्मल ग्रामचा संदेश दिला 
तुकडोजींच्या वचनांनी अवघा मुलुख स्वच्छ केला !
संतांची आणि विचारवतांची पुण्यभूमी इथली 
मराठी पाऊल पुढे टाकण्याची पहाट पहा फुटली !
या मातीचा झाला आहे अबीर गुलाल बुक्का 
डोईवर लावताना पुन्हा करू नका त्या चुका !       
                                           -- बिपीन जगताप 

                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.