उधोजकता
आणि तरुणांचा उत्कर्ष .
खूप
वर्षापूर्वी आपण उच्च शेती, मध्यम
व्यापार, आणि
कनिष्ट नोकरी या संकल्पनेतून जात होतो पण कष्टापेक्षा आरामाचे जीवन सर्वाना आवडू
लागले आणि शेती व व्यापार यांच्याकडे आपले दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज 'बेरोजगारी' या आपण निर्माण केलेल्या
प्रश्नामुळे व्यथित झालो आहे. शिकलेल्या तरुणांना आपण शेती करावी असे वाटत नाही
आणि शेती करणाऱ्या तरुणाला आपली मुलगी द्यावी असे लोकांना वाटत नाही.असी समाजाची
मानसिकता तयार झाली आहे. ज्या मातीवर आपण जगतो त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या
तरुणांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेला आहे. शेती आणि व्यापाराला जो
पर्यंत प्रतिष्टा प्राप्त होत नाही तो पर्यंत बेरोजगारीचे प्रश्न मिटणार नाहीत.
सध्या
उच्च नोकरी, मध्यम
व्यापार आणि कनिष्ट शेती हे सूत्र पाहता उधोग आणि उधोजीकता हे
शब्द मराठी माणसाना खूप जड वाटतात. पण या दोन शब्दांमध्ये अमर्याद काम आणि यश लपलेले आहे. एखादा नोकरी
करणारा माणूस त्याचे पोट कसेही भरू शकतो पण उधोग करणारा माणूस आपल्या बरोबर अनेक
कुटुंबाचे पालन पोषण करू शकतो. पण आपल्याकडे उधोगाची मानसिकता तयार होताना
दिसून येत नाही. अनेकदा लाखो रुपये भरून शिपायाची नोकरी पत्करली जाते पण थोड्या
पैशात छोटा उधोग करणे टाळले जाते. कदाचित अनेकांना उधोगात पडणे धोकादायक वाटत असेल
पण अनेक क्षेत्रात आज आपल्याला जाताना खूप अभ्यास आणि तयारी करून जावे लागते तरच
तो माणूस त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. आपण मात्र उधोगातील कोणताही अभ्यास न
करता लखपती होण्याची स्वप्ने पहातो. कोणताही उधोग यशस्वी करण्यासाठी त्या उधोगाची
इतिन्भूत माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. त्यासाठीची तयारी करणे महत्वाचे आहे.
आपण काही पैशे गुंतवून आणि आपला वेळ श्रम सारे देऊन ज्या क्षेत्रात जात आहोत त्या
क्षेत्राची माहिती असणे खूप महत्वाचे आहे. पण असा अभ्यास करणे टाळले जात आहे.
आज
भारतात सर्वात मोठा प्रश्न बेरोजगार युवकांचा आहे. मोठ्या प्रमाणात असणारी
बेरोजगारी सर्वाना भेडसावत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी शासनाचे सकारात्मक प्रयत्न
सुरु आहेत. नोकरीपेक्षा उधोजाकता वाढवण्यावर शासनाचा भर आहे. एक उधोजक घडवत असताना
त्याच्याबरोबर अनेकांच्या हाताला काम मिळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज मोठ्या
प्रमणात असलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार नोकरी देऊ शकत नाही पण त्यांच्या मध्ये
असणाऱ्या उधोजाकीय कौशल्याचा उपयोग करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या
माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचे फार मोठे प्रयत्न सुरु आहेत. शिकलेल्या
तरुणांना मोफत प्रशिक्षण देण्याचे काम वर्षभर जिल्हा उधोग केंद्र, खादी ग्रामुधोग आयोग, आणि सूक्ष्म व लघु उधोग
मंत्रालय करत असते. ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील लोकांनी उधोगात यावे यासाठी
शासन विशेष प्रयत्न करत असते. प्रशिक्षण दिल्यानंतर देखील तरुणांनी आपले छोटे उधोग
सुरु करावे यासाठी अनेक कर्ज योजना राबविण्यात येतात. सध्या जिल्हा उधोग केंद्र
आणि खादी ग्रामुधोग यांच्याकडे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हि योजना
राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम आणि
रोजगार उपलब्द करून देण्याचे सरकारचे धोरण आहे.
रोजगार
उपलब्ध करण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत पण अजूनही नोकरी या
मानसिकतेतून बाहेर पडत उधोग करण्याची मानसिकता तयार होत नाही हि
वस्तुस्थिती आहे. बेरोजगार युवकांनी उधोगाशील मानसिकता तयार करावी तरच समोर असणारे
भीषण संकट कमी होऊ शकेल. पोट भरण्यासाठी दोन मार्ग आहेत एक नोकरी आणि दुसरा उधोग
या पैकी नोकरीचे क्षेत्र कमी होत आहे. संगणीकरण यामुळे सर्वाना नोकरी लागणे केवळ
अश्यक बाब आहे. त्यामुळे जो दुसरा पर्याय आहे याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक
आहे.
पदवी
आणि त्यापुढील शिक्षण घेत असताना तरुण फक्त वर्ग ओलांडण्याचे काम करत आहेत. शिक्षण
घेत असताना त्याला कष्ट न करता आरामाची नोकरी मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे
उधोगाचा विचार त्याचा डोक्यामध्ये येत नाही. पण शिक्षण संपताच मृगजळासारखे त्याचे स्वप्न
भंग पावते नोकरी लवकर लागत नाही त्यामुळे मग नैराश्य व्यसनाधीनता, आणि जीवनाचा राग या सहज
उत्पन्न होणाऱ्या भावना मनात घर करू लागतात. अनेक तरुण मग चुकीच्या मार्गाने जात
समाजासाठी धोकादायक होतात हे सगळे टाळण्यासाठी आपल्या सर्वांनी तरुणान
योग्य दिशा व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आई वडिलांनी देखील उधोग करण्याची
मानसिकता मुलांच्या मध्ये वाढवावी जेणे करून शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावत
आपल्या लेकराची दमछाक होण्या एवैजी लोकांच्या कुटुंबाचे पोषण करणारा समाजसेवक
निर्माण होईल. समाजातील उधोगातील जाणकारांनी युवकांना उधोगाची भीती दाखवण्यापेक्षा
त्याला संधी म्हणून त्याच्याकडे पाहायला लावणे आवश्यक आहे.
कष्ट
घेण्याची तयारी, अभ्यास
करण्याची प्रवृत्ती,आणि
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, नियोजन या काही मोजक्या
गुणांनी उधोग केला तर अनेकांच्या हाताला काम देण्याची क्षमता आपल्यात प्राप्त होईल
असा मला विश्वास वाटतो. शाळेतील पाठ्पुस्तकात उधोजाकता शिकवली आणि लहानपणापसून
त्याच्यात आवड निर्माण केली तर समाजातील अनेक प्रश्न मिटवता येऊ शकतील. यासाठी खूप
महत्वाचे पण छोटे उधोगांची निवड सुरुवातीला करावी. आपल्या आसपास कोणत्या प्रकारचा
कच्चा माल उपलब्ध आहे, आपली
आवड आणि ग्राहकांची मानसिकता ओळखून उधोगाची निवड करावी जेणे करून उधोगात तोटा न
येता फायदा होईल.
पंतप्रधान
रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून आम्ही अनेक उधोजाकांच्या मुलाखती घेतो.
त्यातून नव उधोजकाच्या मानसिकता लक्षात येतात. आपल्या योजनेतून आम्हाला किती
अनुदान मिळेल? असा
प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना पुढे काय प्रश्न विचारावेत हाच एक मोठा प्रश्न
आमच्यासमोर उभा राहतो. फक्त अनुदान मिळेल सरकारी योजनेचा फायदा मिळेल या अपेक्षेने
उधोजेकतेकडे वळणाऱ्या लोकांनामुळे मोठे नुकसान होते. शासन आपले उधोग चालू
व्होवेत. त्यातून आपल्याला मदत मिळावी आणि आपण इतर बेरोजगारांना रोजगार
उपलब्ध करून द्यावा यासाठी अनुदानाच्या रूपाने एक पाऊल पुढे टाकण्याचा
प्रयत्न करत आहे. आपणही आपली उधोजाकीय मानसिकता तयार करून पुढचे पाऊल टाकण्यासाठी
तयार राहिले पाहिजे तर आणि तरच अनेक प्रश्न सहज सुटू शकतील.
Social Plugin