Type Here to Get Search Results !

सुंदरतेचा पिसारा फुलाला ....!












सुंदरतेचा पिसारा फुलाला ....!

जग हे सुंदर फुलांनी भरले 
निळ्या आकाशात पक्षी उडले.
अथांग सागरात डोळे मिचकावत 
वर वर येत खाली जात राजहंस बुडले 
निळी पहाट जागी झाली 
शुक्राची चांदणी उगवली 
डोलत डौलत गुरे निघाली 
चिमणी चिव चिव'करत उडाली 
लांडोर मोर थुई थुई नाचली 
सप्तरंगाची पिसे पहा सांडली 
नदीच्या पात्रात एक होडी दिसू लागली 
लंपडाव खेळत दूर देशी ऐटीत चालली 
भूपाळी च्या मंद स्वरांनी मंदिर भरले
भक्तीच्या पावन हृदयानी देवालय सजले   
भल्या पहाटे सगळा आसमंत जागा झाला 
निर्मिकाच्या सृष्टीचा सारा पिसारा फुलाला 

-- बिपीन जगताप