Type Here to Get Search Results !

माणूस


                   माणूस 

माणसाच्या आत माणूस असतो 
जन्मभर माणूस माणूस शोधतो 
कसा माणूस माणसाला मारतो 
माणसाला माणूस पुन्हा तारतो 

माणसाला चेहरा माणूस देतो 
माणसाचे गुण माणूसच गातो 
माणसाचे मुखवटे माणूस लावतो 
माणसाचे खोटे चेहरे माणूस फाडतो 

माणसात देव माणूस शोधतो 
माणसातला दानव माणूस होतो  
माणसांच्या दुनियेत माणूस हरवतो 
माणसांचा धर्म माणूस मारतो 

देवत्वाचा शोध माणूस लावतो 
माणसाला देव माणूस करतो 
माणसांची गर्दी माणूस जमवतो 
मानवतेचा झेंडा माणूस रोवतो 

माणसाच्या आत्ता माणूस शोधा
माणसाला आज माणूस भेटवा 
माणुसकीची नाती पुन्हा वाढवा 
माणसाला माणूस सहज मिळावा 

-- बिपीन जगताप