लेकीचा जन्म सोहळा.. !
करा आनंदाचा मेळावा
दोन्ही घरी दिवा लावते
वंश पुढे घेऊन जाते !!
मुलगा मुलगी नको भेद
अविचाराला देऊ छेद
समानतेचा वारसा जपावा
सावित्रीला जन्म मिळावा !!
मुलगी आहे मायेचा झरा
ह्रदयात आता लेकीला धरा
हाच मंत्र आता माना खरा
तरच समाज होईल बरा !!
लेक माझी वाढावी
पुढे जात रहावी
जीवनाच्या संध्याकाळी
डोळे भरून पहावी !!
बिपीन जगताप
Social Plugin