Type Here to Get Search Results !

देवत्वाचा शोध ....














देव आणि मानवात फरक एक आहे 
दोघांच्या आतून चांगुलपणा वाहे 
दगडाच्या मूर्तीला चंदन लावावे 
ह्रदयातील कप्प्यात  सुगंध दरवळावे !! 

श्रद्धा अंधश्रद्धा यात न पडावे 
माणसातले देवत्व फक्त शोधावे 
मनातील आनंदाला लोपू न द्यावे
ह्रदयातील प्रेमाला थांबू न द्यावे  !! 

झरा मायेचा वाहता ठेवावा 
दातृत्वाचा हात कधी न रोखावा 
मदतीचा पाय चालता ठेवावा 
हातामधला हात कधी न सोडावा  !!

देवत्व मग येईल आपल्या उरात
सहज बनेल मंदिर तुमच्या घरात 
देव आणि मानव असतो मनात 
नका जाऊ शोधायला कोणत्या वनात !!

-- बिपीन जगताप