Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही


पाण्याने संसार मोडले .....!

गाव सोडले शहर धरले 
संकटात या घर मोडले 
पाण्याने कसे या जुलूम केले 
हजारो का रे देवा संसार मोडले...! 

काळ्या मातीला भेग पडली 
शेतातील उभी पिके करपली 
शहरातील लोकांनी या दूर लोटले 
पाण्याने का रे देवा संसार मोडले....! 

खोल गेलेल्या पाण्याने  
दुखः झाकले डोळ्याने 
नशिबात दुष्काळाचे वादळ उटले
पाण्याने का रे देवा संसार मोडले...! 


शोधात फिरतोया जल मिळेना कुठे 
दमून भागून कशी पापणी मिटे
आमचेच देवा कसे  नशीब फुटले 
पाण्याने का रे देवा संसार मोडले...! 

लेकरा बाळांना घेऊन चालतो वाट 
हंबरून बघते गाय मिळेना ताट
कुठे नेऊ सांग तिला माझे पाय खुटले 
 पाण्याने का रे देवा संसार मोडले ...!

डोळ्यातील आसवांना कसा दुष्काळ पडेना 
जीवनात आनंदाची कशी बाग फुलेना 
घनश्यामा का रे आम्हा वाऱ्यावर सोडले 
पाण्याने का रे देवा संसार मोडले ...!
......
-- बिपीन जगताप