गजर ...!

तुझ्या नावाचा करतो गजर
तुझ्या रुपाला भुलली नजर
साद तुला घालतो मी देवा
वाहतो तुझ्या चरणी जीवा...!
नयनी माझ्या तुझे रूप
देह मंदिरी लावला धूप
कर कटेवर विटेवर उभा
वाहतो तुझ्या चरणी जीवा ...!
करतो आहे तुझी वारी
जिंदगी हि तुझीच सारी
ह्रदयात आज पेटू दे दिवा
वाहतो तुझ्या चरणी जीवा ...!
पंचप्राण माझे काकुळती आले
तुझ्या पायरीशी समर्पित झाले
परमात्मा आज भेटू दे शिवा
वाहतो तुझ्या चरणी जीवा ...!
-- बिपीन जगताप
Social Plugin