Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही


प्रेमाचे बंधन...! 

प्रेमाने जोडलेली नाती भक्कम असतात.
भावनांच्या वादळातही टिकून राहतात.
प्रेमाचा हिंदोळा अलगद येत राहतो 
लांबच्या माणसाना कवेत घेऊन येतो ...!

प्रेम असते ह्रदयातील  हळव्या कोपऱ्यात
प्रेम असते डोळ्यांतील एक थेंब पाण्यात 
प्रेम असते निशब्द होणाऱ्या मुकेपणात
प्रेम असते सागराला सरिता मिळण्यात ...!


अशी प्रेमळ माणस आयुष्यात  भेटतात 
जीवनाची सुंदर फुलबाग फुलवतात 
जातानाही माणसाला चटका लावतात 
ह्रदयातील कोपऱ्यात कायमची बसतात ...!

प्रेमाने जग जिंकता यावे यासाठी जगावे 
माणसाच्या ह्रदयात घर करून रहावे
आपला जवळचा भेद असा संपून जावा 
जीवनात आनंदाचा सूर्योदय व्हावा.....!

-- बिपीन जगताप