थांब रे गड्या ....!
थोडे बोलू थांब
मनातील गुज असे
थोडे सांगू ना ...!
शर्यत मोठी
अशी जीवनाची
घडीभर वेळ नाही
ह्र्दय खोलण्याची
थांब ना जरा थोडे भांडू ना ..!
कसे रे जिने आले नशिबी
स्वतःसाठी जगणे
कसे गेले विसरुनी
थांब ना जरा खेळ मांडू ना ..!
घेऊ हाती पुन्हा ती विटी दांडू ना ..!
मैत्रीचे धागे कुठे गेले रे
शरीर सारे थकले कसे रे ..
चाल रे गड्या आता पुढे चाल रे
मावळतीकडे आता नको पाहू रे !
- बिपीन जगताप
www.facebook.com/bipinkumar14
bapujagtap@gmail.com
Social Plugin