मागील काही दिवसा पासून सगळीकडे चांगला पाऊस पडत आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे पावसाने झोडपून काढले आहेत. यंदा उन्हाळा जोरदार असल्याने पाऊस चांगला येणार अशी आशा सर्वांनाच होती आणि तसेच झाले आहे. पाऊस जोरदार कोसळत आहे. जून महिन्यात सुरु झालेला हा पाऊस कोणालाही उसंत घेऊ देत नाही. महाराष्ट्रातील अनेक धरणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. विधर्भात चंद्रपूर आणि गडचिरोलीत पिके पाण्याखाली गेली आहेत. १०० कोटीचे रस्ते वाहू गेले आहेत.
पावसा पावसा ये रे …तुला देतो पैसा असे म्हणताना आता पाऊस आला आणि पैसा घेऊन गेला असे म्हणावे लागत आहे.
आता पाऊस असाच पडू लागला तर अनर्थ घडेल. लोकांचे नुकसान होइल. शेती अडचणीत येइल. त्यामुळे आता पावसाने आणि बळीराजाला आपले काम करण्यास उसंत द्यावी हीच प्रार्थना आता वरुणराजाला करावी लागणार आहे.
Social Plugin