Type Here to Get Search Results !

साधा माणूस ..!

मी आहे साधा माणूस ..!




मी नाही संत नाही विचारवंत 
माझा नाही कोणताच  पंथ
मला कोणीच भेटला नाही महंत
मी अडाणी आहे हीच मोठी खंत !

मला अध्यात्म नाही कळत 
माझे मन देवाकडे नाही वळत 
मला खूप गंभीर होता येत नाही 
मला खूप ताणही घेता येत नाही !

मी सारे जग बदलू शकत नाही 
मी जगाला साधा विचार देत नाही 
मला माझ्या गावातही पुरेसे ओळखत नाहीत 
जगाने ओळखावे अशी स्वप्नातही इच्छा होत नाही !

माझी  कधी मोह माया सुटली नाही 
अजूनही मातीची नाळ  तुटली नाही 
लोकांच्या दुखः त  मी दुखः मानतो 
लोकांच्या सुखात मी मनसोक्त नाचतो !

मी माझ्यापुरता फक्त बदलीन म्हणतोय 
उद्या सुरुवात करीन असं मनाला सांगतोय 
पण रोजचा दिवस मला नवा नसतोय 
माझ्याच  मनाला मी दररोज हसतोय ! 

         --- बिपीन जगताप