Type Here to Get Search Results !

पाऊले चालती पंढरीची वाट...!

पाऊले चालती पंढरीची वाट...!
खांद्यावर भगवी पताका...हातात टाळ...गळ्यात तुळशीची माळ...मुखात रामकृष्ण हरि...महाराष्ट्रात आता भक्तिचा पुर येणार आहे. भक्तीभावाने महाराष्ट्र चिंब भिजनार.
उद्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखिचे प्रस्थान होत आहे.परवा माउलींचे...!
लाखो वारकरी शेकडो मैल अंतर माऊली माऊली म्हणत पार करणार. राम कृष्ण हरीचा गजर करत संसार दुःखापासून काही दिवस समाधान आनंद उपभोगनार...!
माणूस भौतिक सुखाच्या मागे लागला की त्याचे समाधान हरवते मानसिक आत्मिक शांतता भंग पावते. संसार सुरु झला की मानुस संसारात गुरफुटुन जातो अनेकदा मनापासून जीवन जगण्याची इच्छा असताना त्याला तसे जगता येत नाही.
पंढरीचि वारी माणसाला जगण्याचा आनंद देते. 'जी लो अपनी जिंदगी' या उक्ति प्रमाणे वारकरी खऱ्या अर्थाने काही दिवस जगतो. मनसोक्त नाचतो...उड्या मारतो ...फुगड्यांचा फेर धरतो...!
माणसाच्या भावनिक गरज वारी पूर्ण करते. इथे भेद नाही. स्त्री पुरुष ..उच्च..नीच..स्पृश्य ..अस्पृश्य..कोणताच भेद वारीला मान्य नाही.
संतानी माणसाला माणूसपण शिकवले. पंढरीच्या पांडुरंगाला समोर ठेऊन संतांच्या पालख्या गजर करत निघतात. महाराष्ट्राला बन्धुत्वचि शिकवण देतात. समरस होऊन जीवन जगण्याची कला शिकवतात. ही आध्यात्मिक शक्ति आपल्याला देताना प्रत्येकात ईश्वर पाहायला शिकवतात. माणसाला शांतता आणि समाधान हवे असते त्यासाठी एकदा या पंढरीच्या वारीत जावे भक्तिरसात चिंब भिजावे. देव आहे की नाही मला माहित नाही पण ज्या तुकोबानी आम्हाला भक्तिचा बंधुत्वचा वारसा दिला तो आम्ही जपनारच...! ज्या तुकोबानी आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने..म्हटले ती रत्ने आम्ही उधळणारच...!
- बिपिन जगताप
9404140980