मागील पंधरा वर्षात सोशल मिडिया जन्माला आले.आणि बघता बघता सर्व भाग व्यापून टाकण्यात हा मिडिया यशस्वी जाला. शहरापासून गावापर्यन्त सगळीकडे .. सर्व स्तरातील लोकांनी या मीडियाला आपलेसे केले.
मनातील भावना व्यक्त करण्याचे हे माध्यम लोकांनी सध्या डोक्यावर घेतले आहे. स्मार्ट फोन चा वापर जगातील अनेक देशापैकी भारतात तुलनेने जास्त आहे. सोशल मिडिया शाप की वरदान हा विषय आता सतत चर्चेला जाईल. माणूस हा नाविन्याचा शोध घेत असतो. संशोधन करत नविन तांत्रिक बाब शोधत असतो. माणूस आनंद घेण्यासाठी तंत्राचा असा वापर करीत आहे. फेसबुक च्या आभासी जगात आपण दिवसाचा खुप वेळ घालवु लागलो आहोत. स्वतःचे रूप लोकांनी बघावे त्यावर कमेंट करावी अशी मानसिकता तयार होताना दिसून येत आहे. वारंवार फोटो टाकने स्टेटस अपडेट करत फ़्रेंडिलिस्ट वाढवत राहणे नविन युगाचा हॉबी जाला आहे.
व्हाट्सएप वर मेसेज फॉरवर्ड करीत राहणे.विनोद आणि राजकारणी लोकांची टिंगल टवाळी करत दिवस काढनारे इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
नव्या जमान्याची भाषा आता हा मिडिया असेल पण त्यात वाहत जाणे किंवा बुडून मरणे हे दोनच पर्याय सध्या दिसत आहेत.
व्हाट्सएप वर हजारो ग्रुप आहेत. जो तो उठतो ग्रुप काढतो आहे. मनाला वाटेल तो सेव्ह असणारा नंबर ग्रुप मधे टाकून मोकळा होतो. मग साऱ्या ग्रुपवर जवळ जवळ तेच मेसेज दिवसभर फिरत राहतात. काही ग्रुपवर निश्चितच महत्वाच्या चर्चा होतात पण त्याही अर्धवट अनेक ग्रुप वर आपण असतो पण त्यावर आपण किती सक्रिय आहोत याचाहि अभ्यास होने आवश्यक आहेत.
घरातील लहानानबरोबर खेळण्यास वेळ नाही. बायको बरोबर बोलन्यास टाइम नाही.
कित्येक वर्षापासून आई वडिलांबरोबर गप्पा नाहीत. भान हरपुन पुस्तक वाचले नाही.
आज या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आपण प्रत्येकजन आभासी जगात मश्गुल आहोत. न चुकता होणारे गुड़ मॉर्निंग गुड़ नाईट पर्यन्त चे प्रत्येक कार्यक्रम अगदी छान चालू आहेत पण घरातील कौटुम्बिक सदस्याना वेळ नाही. ग्रुपवरुन कोणी निघुन गेले की विचार येतात का सोडला असेल ग्रुप ...बैचैन होतो पण संसाराचा जोड़ीदार निघुन जाण्याची वेळ आली तरी त्याबद्दल काही वाटत नाही.
हा नवा मिडिया आपलासा करा पण त्याचे गुलाम होता कामा नये अन्यथा आपला आनंदाचा झरा आटल्याशिवाय राहणार नाही.
स्वतःला व्यक्त होण्यासाठी जेवढे आपण याचा वापर करू तेवढे यात गुंतत जाऊ. आज कित्येक कवी लेखक या मिडिया मुळेच जन्माला आले आहेत हेही विसरून चालणार नाही. नवोदितांचे हे व्यासपीठ आहे त्यांच्यातील लेखकाला घडवण्यात या मिडियाचा मोठा हातभार आहे.
प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या याचे वर्चस्व असताना आज फेसबुक,व्हाट्सएप,ट्विटर या सोशल मिडियाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
पुढचा काळ हा आता या मिडियाचा असेल. लोकशाहितील चौथा खांब आता लोकांच्या हातात आहे. पण त्याचा वापर अतिशय विवेकाने संयमाने करने गरजेचे आहे. धर्मं जात यांचा वापर हा मिडिया रक्त सांडण्यासाठी करू शकतो याचे भान ठेवावे लागेल.
मानवता हाच खरा धर्म आहे आणि तो जपन्यासाठी आपल्याला संयमाने पुढे जावे लागेल.
मिडिया कोणताही असो त्याचा वापर माणूस कसा करतो यावर त्याचे यश अपयश अवलंबून आहे. आपण सोशल मिडिया वर सक्रीय राहत असताना माणुसकी मानवता चिरडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आपल्या धर्माचा जातीचा उदो उदो करताना दुसर्यांच्या धर्माचा आदर राखता येतो का ते ही एकदा तपासून घ्यावे.
सोशल मिडियाचा वापर मर्यादित, संयमाने विवेकाने केल्यास हा मिडिया आपल्यासाठी आनंद आणि प्रेमच घेऊन येईल यात शंका नाही.
- बिपिन जगताप
Social Plugin