माणसांच्या गर्दीत माणसं शोधताना...!
बिपीन जगताप हे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारं नावं. बापू या नावाने ते आपल्या मित्र परिवारात ओळखले जातात. महाराष्ट्र शासनाच्या मध संचलनालयात महाबळेश्वर येथील हेडक्वार्टरमध्ये ते संचलनालयाचे संचालक पदावर काम करीत आहेत. प्रत्येकाला आपला आणि जवळचा हा माणूस मध विभागात काम करीत असल्याने त्यांच्या कामाचा गोडवा अजून वाढला आहे. बिपीन जगताप यांचा साद हा काव्यसंग्रह सध्या गाजतोय...हृदयातील स्पंदने हा त्यांचा ब्लॉगही प्रसिध्द आहे. संवेदनशील मनाचा, वाचकांच्या मनात व्हीजन पेरणारा कवी, साहित्यिक म्हणून ते राज्याला परिचित आहेत. या आठवड्याच्या थिंक टँक कट्टामध्ये त्यांनी आपला साहित्य प्रवास उलगडून दाखविला आहे.
थिंक टँक वेब टीमने बिपीन जगताप यांच्याशी मुलाखतीबाबत संपर्क केला आणि काही वेळातच त्यांची ही गोड, मधूर मुलाखत सुरु झाली. एनी टाईम अॅव्हेलेबल असणारा हा कवी मनमोकळेपणाने बोलू लागला. प्रश्न आणि उत्तर स्वरुपात त्यांच्याशी झालेला हा संवाद जसाच्या तशा खास आपल्यासाठी...

बिपीन जगताप - मी मुळचा कांबळेश्वर गावचा रहिवासी. कांबळेश्वर हे बारामती तालुक्यातील एक खेडेगाव. याच गावात माझी जडणघडण झाली. ग्रामीण भागातील रांगडी माणसं, ओतप्रोत भरलेला निसर्ग याचे मला आकर्षण होते. जे पाहिले ते कोणत्या तरी स्वरुपात मांडावे, ही सततची इच्छा होती. ती इच्छा कवितेच्या माध्यमातून आविष्कृत होऊ लागली. मी काही वर्षे दै. सकाळ वृत्तपत्रात पत्रकारिता केली. पत्रकारिता करीत असताना साहित्यिक लेखन सुरुच होते. सकाळमध्ये वैविध्यपूर्ण कॉलमही चालविला. त्यातूनच लेखणाची प्रेरणा अधिक बळावली. कालांतराने मी प्रशासकिय सेवेत रुजू झालो. सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम माझ्यासाठी संवाद मंच बनले. हृदयातील स्पंदने हा माझा ब्लॉग वाचकांनी डोक्यावर घेतला. वीस हजारांहून जास्त वाचक या ब्लॉगला लाभले आहेत.
थिंक टँक वेब टीम - सध्यस्थितीतील साहित्यबाबत तसेच साहित्यप्रवाहांबाबत आपण काय भूमिका मांडाल?
बिपीन जगताप - खरं तर साहित्य हे भावना, विचार मांडण्याचे माध्यम आहे. साहित्याला जात, धर्म, वय, लिंग, प्रदेश याचे वावडे नसते. कोणतेही साहित्य प्रस्थापित अथवा नवोदित असत नाही. फार तर रंजनवादी आणि वास्तववादी असे प्रकार करता येतील. मात्र प्रत्येक साहित्य हे माणसाला कोणतातरी विचार देत असते. विचार देणे हाच साहित्याचा स्थायीभाव असतो. या स्थायीभावाला जागून निर्मिलेले साहित्यच वाचक, रसिकांना भावते. मी तेच करीत आहे. वास्तवावर मी खूप लेखन करतो. ते वाचकांना आवडतेही.

थिंक टँक वेब टीम - प्रेम हा अनेक कवींचा आवडीचा विषय असतो. आपण याकडे कसे पाहता?
बिपीन जगताप - कधीच न भेटणारी माणसे भेटाविशी वाटतात... सहज बोलता बोलता मग आपली होऊन जातात... जीवनाच्या प्रवासात असे अनेकजण भेटतात. पण त्यातलीच काही ह्रदयाच्या कप्प्यात कायमची घट्ट बसतात... कधी कधी जिव्हाळा एवढा वाढतो कि मग ते आपल्या जीवाभावाचे होऊन जातात.... प्रेम असे कसे बसते माणसाला एक करून टाकते. जगात सुंदर मनाची ह्रदयाची माणसे अजून तरी आहेत यावर विश्वास बसायला लागतो. एखाद्या अपरिचित माणसाबद्दल मग जिव्हाळा उत्पन्न कसा होतो हे मनाला उमगत नाही. मग त्या अपरीचीताबद्दल उगाच आपल्याला हूर हूर वाटू लागते. असे प्रेम माणसाबद्दल निर्माण झाले तरी काही बंधने पाळावी लागतात. सहज सहजी सगळे जमून येईल असे सांगता येत नाही. एखादा जिवलग जीवनाच्या वाटेवर कुठे तरी भेटावा असे मात्र मग मनापासून वाटते. निस्वार्थ भावाने प्रेम करणारी माणस तशी विरळच...!. पण असतात यावर मात्र विश्वास ठेवावा लागतो. सगळे जग फसवे आहे. सगळे कोणत्या न कोणत्या स्वार्थाने आपल्याकडे येतात असा सतत विचार करू नये. मनाची पारदर्शकता आणि ह्रदयाची निर्मळता असेल तर माणसात परिवर्तन होऊ शकते.

थिंक टँक वेब टीम - आगामी काळात आणखी काय करायचे प्रयोजन आहे?
बिपीन जगताप - मला जे भावते ते मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही कविता ही वाचकांशी थेट संवाद साधणारी असावी, असा माझा प्रयत्न असतो. मी असंख्य कविता निसर्गावर लिहिल्या आहेत. बहुतांशी कविता निसर्ग आणि माणूस यांच्यातील संवाद प्रतिध्वनित करतात. मी हृदयाची स्पंदने या ब्लॉगवर सातत्याने लेखन करतो. कवितेसह लेखही लिहिण्याची मला आवड आहे. सहवासात आलेल्या अनेक व्यक्तींवर मी लेखन केलेय. त्यातून एक समाधान मिळते. आगामी काळात ब्लॉगद्वारे उत्तमोत्तम लेखन करण्याचा मनोदय आहे.

थिंक टँक वेब टीम - तुमचे निसर्गाबाबतचे निरीक्षण अगदी मनाला भावणारे आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील एकरुपता आणि द्वंद्वाबाबत आपण कसा विचार करता?
बिपीन जगताप - माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. निसर्गाच्या अनेक रहस्यापैकी माणूस एक रहस्य आहे. माणसाला इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी शारीरिक ताकद जरी दिली असली तरी त्याला ज्ञान आणि बौद्धिक कौशल्य फार मोठ्या प्रमाणात दिले आहे. निसर्ग आणि माणसाचे जीवन हे निसर्गाचाच एक कलाविष्कार आहे. आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात. पण अनेकदा त्या स्वप्नवत वाटतात. माणसाने अस्तित्वात नसणार्या अनेक गोष्टीना जन्म दिला आहे. शरिरात किवा बाहेर कुठेही सापडत नसलेले मन माणसाने शोधले. रोज उगवणार्या सूर्याला आणि चंद्राला त्याने रात्र दिवसात मोजायला सुरुवात केली. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीना माणसाने नाव दिले. प्रत्येकाचे नामकरण झाले. अशा अनेक बाबी आहेत ज्या माणसाने सुरु केल्या. जगात माणसाचा जन्म झाला त्यावेळी सगळी माणस सारखीच होती. कदाचित त्या वेळी आपण एक सारखे दिसत आहोत म्हणून आपण आपल्याला माणूस हे नाव शोधून काढले आणि आपणच या नावाचे आपल्यासाठी बारसे केले असावे. मग पुन्हा एक महत्वाची गोष्ट माणसाच्या लक्षात आली असावी माणसातही फरक आहे. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. स्त्री असणारी शरीराने कमकुवत तर काही शारीरिक भेद दोघांमध्ये दिसू लागले .मग शरीराने कमकुवत असणार्या स्त्री वर पण निसर्गाचे तंत्र त्यांच्या लक्षात आले असावे आपल्या सारखीच माणस निर्माण करण्यासाठी निसर्गाची हि निर्मिती आहे. माणसाचा माणसाशी खरा भेद सुरु इथे सुरु झाला आहे असे मला ठामपणे वाटते. मग आजपर्यंत जे भेदामुळे मनुष्याचे नुकसान झाले आहे ते अगणित आहे.
जात, धर्म, स्त्री,पुरुष, भाषा, रंग, प्रांत, गरीब, श्रीमंत,शहरी ग्रामीण, सुशिक्षित अडाणी,ज्ञानी,अज्ञानी, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या भेदामुळे माणसाला माणसापासून तोडण्याचे काम केले आहे. निसर्गालाही या सगळ्याचे आश्चर्य वाटत असेल. निसर्गाने फक्त एक माणूस घडवला माणसाने सारा निसर्ग बिघडवला. त्याचे सारे नियम पायदळी घेऊन विश्वाचा रचिता मीच आहे म्हणू लागला. स्वतःची प्रतिमा पूजन करून आपल्याला देव म्हणू लागला. काही वर्षापूर्वी आणि आजही काही लोक निसर्गाची पूजा करतात. यात सूर्य, चंद्र, अग्नी, वारा, जमीन यांचा समावेश होतो. हुशार माणसाने काही पुस्तके लिहिली त्याला नंतर धार्मिक ग्रंथ नाव पडले असावे. त्यात माणसाने कसे वागावे धर्माचे पालन न केले तर काय होते. आणि अशा काल्पनिक मनातून कल्पनेचे अनेक धर्म जाती उभ्या राहिल्या यातून भेद निर्माण झाले. ज्यातून रक्त सांडले. संपूर्ण माणूस आणि निसर्गाचे अतोनात नुकसान झाले ते कशानेही भरून निघणारे नाही. माणसाने तयार केलेले हे मानव निर्मित जाती धर्म आणि इतर भेद संपवता नाही का येणार? माणसातील माणूसपण जागे करून त्याला निसर्गाशी एकरूप नाही का करता येणार? प्रेम आणि फक्त प्रेम देत जीवन नाही जगता येणार ? प्रत्येकाला इथे भीती आहे. हि भीती निसर्गातील प्राण्यांची, विध्वंसाची नाही तर माणूसपणाची आहे. माणूस माणसाला संपवतो आहे. हे थांबवण्यासाठी आपल्या सर्वाना माणूस म्हणून जगात असताना निसर्गाला जोपासत जगावे लागेल. अन्यथा माणूस हा या विश्वात खूप हुशार आणि सुंदर प्राणी होता असे एक दिवस म्हणण्याची वेळ निसर्गाला येईल.

बिपीन जगताप यांच्या कविता खास आपल्यासाठी...
निरोप
घरापासून लांब दूर जाताना
मायेची माणस सोडताना
डोळ्यांच्या कडा पाणवतात
आठवणी पुन्हा दाटून येतात !
घरापासून लांब दूर जाताना
मायेची माणस सोडताना
डोळ्यांच्या कडा पाणवतात
आठवणी पुन्हा दाटून येतात !
कित्येक दिवस घालवलेले
एकमेकांच्या संगतीने
कित्येक रात्री गेलेल्या
मनातल्या गुज गोष्टीने !
एकमेकांच्या संगतीने
कित्येक रात्री गेलेल्या
मनातल्या गुज गोष्टीने !
ते दिवस आता येणार नाहीत पुन्हा
मनाचा हळवा कोपरा राहील आता सुना
मनाचा हळवा कोपरा राहील आता सुना
मुठीत साठवलेल्या वाळूसारखी
माणस अशी सुटून जातात
घट्ट पकडण्याच्या नादात
माणस अशी निघून जातात !
माणस अशी सुटून जातात
घट्ट पकडण्याच्या नादात
माणस अशी निघून जातात !
कोणत असं नात असत
मनाला हुरहुर लावत
कोणता हे प्रेम असत
डोळ्यांना ओलं करत !
मनाला हुरहुर लावत
कोणता हे प्रेम असत
डोळ्यांना ओलं करत !
-बिपीन जगताप
गरिबी विकायला गेलो...!
शहर फिरल्यानंतर खूप वर्षांनी वस्तीवर आलो
वार्याने छळून विस्कटलेल्या झोपडीत बसलो
माझ्याच रक्ताची बहिण भाऊ लांब उभे होते
मला संकोचत बघत लाजत दूर जात होते
आईने फाटक्या पदराने तोंडावरचा घाम पुसला
माझा साहेबी वेश पाहून बाप दाराशी थबकला
मी चटकन उठलो आई बापाचे पाय शिवलो
तसा बाप मागे सरकला
चिखलाचे पाय मागे घेऊ लागला
खूप दिवस गेले होते घरादाराला सोडून
धंदा शोधायला लांब शहरात जाऊन
तुटक उभ्या बहिणीला जवळ मी घेतलं
भावाच्या पाठीवर मायेच हात फिरवल
त्या झोपडीत माझ्या उबदारपणा आला
जेव्हा आईच्या हातानी जवळ मला घेतला
बराच वेळ आई बोलत नव्हती
डोळ्यातून तिच्या फक्त आसव सांडत होती
बापाकडे पाहून मी म्हणालो
गावाकडच्या गरिबीला विकायला शहरात गेलो
काम करून थकून बाबा मीच कायमचा मेलो.
पुन्हा तुमची आठवण यायची
डोळ्यातून ती पाझारायाची
या झोपडीतील दारिद्र्याला
भिऊन लपून बसायची
बाप काहीच बोलत नव्हता
मुकेपणाने ऐकत होता
बाहेरच्या उन्हाकडे पाहत
माझ्या चेहरा निरखीत होता
मुकेपणाने बोलत होता
शहर आणि गाव दोन्हीत फरक असतुया
उन्ह आणि सावलीचा खेळ असतुया
शहराने दिलेल्या कपड्यात
आणि बापाच्या फाटक्या धोतरात
आईच्या पदराआड लपलेली गरिबी
पुन्हा मला दिसू लागली
काळ्या मातीकडे आणि अथांग आकाशाकडे
एकाच वेळी नजर आमची गेली !
वार्याने छळून विस्कटलेल्या झोपडीत बसलो
माझ्याच रक्ताची बहिण भाऊ लांब उभे होते
मला संकोचत बघत लाजत दूर जात होते
आईने फाटक्या पदराने तोंडावरचा घाम पुसला
माझा साहेबी वेश पाहून बाप दाराशी थबकला
मी चटकन उठलो आई बापाचे पाय शिवलो
तसा बाप मागे सरकला
चिखलाचे पाय मागे घेऊ लागला
खूप दिवस गेले होते घरादाराला सोडून
धंदा शोधायला लांब शहरात जाऊन
तुटक उभ्या बहिणीला जवळ मी घेतलं
भावाच्या पाठीवर मायेच हात फिरवल
त्या झोपडीत माझ्या उबदारपणा आला
जेव्हा आईच्या हातानी जवळ मला घेतला
बराच वेळ आई बोलत नव्हती
डोळ्यातून तिच्या फक्त आसव सांडत होती
बापाकडे पाहून मी म्हणालो
गावाकडच्या गरिबीला विकायला शहरात गेलो
काम करून थकून बाबा मीच कायमचा मेलो.
पुन्हा तुमची आठवण यायची
डोळ्यातून ती पाझारायाची
या झोपडीतील दारिद्र्याला
भिऊन लपून बसायची
बाप काहीच बोलत नव्हता
मुकेपणाने ऐकत होता
बाहेरच्या उन्हाकडे पाहत
माझ्या चेहरा निरखीत होता
मुकेपणाने बोलत होता
शहर आणि गाव दोन्हीत फरक असतुया
उन्ह आणि सावलीचा खेळ असतुया
शहराने दिलेल्या कपड्यात
आणि बापाच्या फाटक्या धोतरात
आईच्या पदराआड लपलेली गरिबी
पुन्हा मला दिसू लागली
काळ्या मातीकडे आणि अथांग आकाशाकडे
एकाच वेळी नजर आमची गेली !
-बिपीन जगताप
Balasaheb maghade sub-editor pudhari solapur
Social Plugin