Type Here to Get Search Results !

भारताचे रत्न हरपले...!

भारताचे रत्न हरपले...!
वयाच्या 80 व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असा उस्ताह....ऊर्जा....बोलण्याची लकब.....केवळ आश्चर्य..!
ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे भारत मातेचा महान सुपुत्र...मी जन्माने कोण आहे यापेक्षा मी भारतीय आहे ही ओळख सांगणारा ...भारत रत्न आज आपल्या मातृभूमी ला सोडून गेला आहे.
संपूर्ण जीवन आदर्शमय जगणारा महान अवलिया आता शरीररूपाने दिसणार नाही. आपल्या विचारानी संपूर्ण देशभरातील तरुणांना प्रेरणा देणारे आणि मी जीवनभर शिक्षक आहे असे ठनकावून सांगणारे कलाम सर भारतभूमिचे प्राण होते.
दारिद्र्य माणसाच्या प्रगतिच्या आड येत नाही. शिकन्याची जिद्द असेल तर माणूस राष्ट्रपती पदापर्यन्त पोहचू शकतो हेच कलाम सरानी दाखवून दीले.
स्वामी विवेकानंद यांच्या नंतर संपूर्ण तरुणांना प्रचंड ऊर्जा देणारे व आकर्षण असणारे अब्दुल कलाम होते.
भारताचा मिसाइल मैन हरपलाअसला तरीही त्यांच्या विचारांची मशाल अजुन हजारो वर्ष तेवत राहील.
भारतरत्न ऐ.पी.जे.अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
- बिपिन जगताप
9404140980
Tags