Type Here to Get Search Results !

तरुणाई ....राष्ट्रीय शक्ती...!

तरुणाई ....राष्ट्रीय शक्ती...!

तरुणाईची शक्ती आफाट असते...आकाशाची निळाई...अथांग सागराची खोली आपल्या कवेत घेणाऱ्या जोशाला, उत्साहाला तरुण म्हणतात. जो जीवनाचा सुखाचा आणि आनंदाचा काळ समाजाला जातो तो तारुण्याचा .
तरुणपणाचा हेवा प्रत्येकालाच वाटत आला आहे. कोणत्याही माणसाला तरुणपण सरू नये असे वाटते. वय जसे वाढत जाते तसे माणसाला तारुण्य संपत चाललेय हि भावना दुखः दायक वाटते. त्यामुळे अनेक वयोवृध्द केस काळे करून आपण तरुण आहोत असे दाखवतात. त्यामुळे तारुण्य सगळ्यांना खूप छान वाटते पण वास्तव असे आहे कि तरुणपणातच तारुण्य समजत नाही . वय निघून जाते आणि मग मनाला चुटपूट लागते असे अनेकदा होते. जो पर्यंत हाती सत्ता आहे तो पर्यंत हे जग सलाम करते हा जसा जगाचा कटू नियम आहे. तसाच जीवनाचाही जो पर्यंत तुम्ही उस्ताही आणि जोशाने काम करता तो पर्यंत जीवनाचा आनंद घेता पण ज्यावेळी शरीर साथ देत नाही त्यावेळी मन ताजे असून चालत नाही.
आजची युवा पिढी हे सारे विसरत चालली आहे. तासान तास फेसबुक वर बसणाऱ्या तरुणांना आज आपल्या तारुण्याचा विसर पडलाय असे वाटते. ज्या काळात अभ्यास करायचं, मैदानावर जाऊन खेळायाचेय, नदीत जाऊन डुंबायचेय त्या काळात आपण व्यसनाधीन झालोय फेसबुकचे, तंबाखू ,गुठखा आणि दारूचे ...! आपल्या आई वडिलांनी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या आपल्याकडून त्यांना वाटत होते 'पोरग शिकलं मोठ सायेब हुईल आणि आमच्या हातच काम कमी होईल' पण पोरग त्यांना फसवतंय कॉलेजला जातो म्हणतेय पण जात नाही. मित्रांबरोबर रात्रंदिवस फिरतंय. मोबईल वर बोलताय आणि नको तसे दिसतंय....! हि वस्तुस्थिती आहे आजच्या तरुणीची.
देश आणि समाज कुटुंब याचे भवितव्य सशक्त तरुणांवर अवलंबून असते. आणि जर तरुण तरुणपणच विसरला तर होणारे नुकसान फार मोठे आहे. जे भरून न येणारे आहे. त्यासाठी जबाबदार कोण हा नवा प्रश्न निर्माण होतोय.
ज्या शाळेत मुलाला टाकले कि जेथून त्याच्यावर चांगले संस्कार होतील अशी अपेक्षा होती. जेथून त्याला मूल्य मिळणे आवश्यक होते.पण तिथेच सध्या दुष्काळ आहे मुल्यांचा याला काही अपवाद हि असू शकतील. जे शिक्षक व्यवसाय म्हणून या कडे न पाहता साधना समजतील. ते हे काम करतील. चांगले संस्कार देतील आपल्या कृतीतून जे समाजाला उपयोगी पडतील. समाजातील प्रज्ञावंत आणि विचारवंत याकडे पाहत नाहीयेत. तरुण आणि त्यांचे प्रश्न या सारखा विचार करायला दुसरा कोणताही मोठा विषय असू शकत नाही. खूप मोठ्या प्रमाणात होत असलेले दुर्लक्ष आपल्या सर्वाना महागात पडणारे आहे .
वाढत चाललेली बेकारी, व्यसनाधीनता , उच्च राहणीमान, सुरु असलेली स्पर्धा , आणि बोकाळत चाललेली लैगिकता, अति मोबईल वापर आणि त्यातून आत्ता नव्याने आलेले फेसबुक या सर्वांच्या माधमातून तरुण आणि युवकांचे फार मोठे नुकसान होत आहे.
यावर काही उपाय शोधणे आवश्यक आहे. तरुणांना वस्तुस्थीचे भान आणून देणे महत्वाचे आहे. आज व्यसनमुक्तीवर बोलले जात नाही तसेच नोकरी पेक्षा रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात नाही. त्यासाठी मोकळ्या आभाळाकडे पाहण्याची नजर त्याला द्यावी लागेल.. निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा कोणतेही सोंदर्य लोभसवाणे नसते हे त्याला दाखवावे लागेल. आणि समाजात चांगली लोक असतात त्यांना भेटून समाजशास्त्र शिकवावे लागेल. संतांच्या चरित्रातून त्याला माणुसकी जगायला लावावे लागेल आणि या सगळ्यातून जो तयार होईल तो या देशाला, समाजाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाईल जी अशास्वत असेल.
यासाठी समाजातील सर्व जाणकारांनी एकत्र येणे आवश्यक आहे तर आणि तरच हे तरुणपण वाचवता येईल.अन्यथा आपली शक्ती वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला आपण जबाबदार असू.......!
                                                                                                                                
    -- बिपीन जगताप
Tags