समाजसेवेचा नवा दृष्टीकोन …! बारामतीतील फोरम चा दृष्टी दानाचा उपक्रम …!
"या जगाला जाताना मी माझे डोळे देऊन जाईन ज्यामुळे हे सुंदर जग पुन्हा कोणीतरी माझ्या डोळ्यांनी पाहिलं" असे एका जाहिरातीमध्ये विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आपले निळे डोळे अजून मोठे करत सांगते. पण समाजात कित्येक गरीब लोक आहेत ज्यांच्या डोळ्यावर दिवसेंदिवस पांढरा पडदा पडत चाललेला आहे. हे सुंदर जग बघण्यासाठी या डोळ्यांची शक्ती कमी होत आहे. भविष्यात डोळ्यापुढे येणाऱ्या अंधाराने यांची काळजी वाढली आहे.
ग्रामीण भागातील स्त्रिया चूलिवर स्वयंपाक करतात. डोळ्यात कित्येक वर्ष धूर जातोय. डोळे पाण्याने भरतात डोळ्यांचे आरोग्य धोकादायकपणे सुरु आहे. पण त्यांच्याजवळ काही पर्याय नाही. गावातील प्रत्येक एक दोन घर सोडून तिसऱ्या घरातील माणसाला अंधुक दिसत आहे. त्याला काचबिंदू अथवा मोतीबिंदू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्याच्या बुबुळावर पडदा पडत चालेला आहे. त्याच्या डोळ्यापुढे भविष्यात अंधार येणार आहे पण हे माहित असूनही डोळ्यांचे ऑपरेशन करणे सहज शक्य होत नाही. मुलगा शिकतोय त्याला पैसा पाहिजे. शेती पिकावर होणारा खर्च झेपत नाही. काम धंदा नाही अशा अनेक कारणामुळे डोळ्यांचे आजार बळावत जातोय .
बारामती मध्ये आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली दृष्टी दानाची चळवळ मागील काही वर्षात जोर धरू लागली आहे. समाजासाठी नेमके काम करण्याच्या हेतूने उभारलेल्या
इनव्हारमेंटल फोरम ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो गोर गरीब लोकांच्या डोळ्यातील तेवत असणारी ज्योत कायम ठेवण्याचे काम या फोरमच्या माध्यमातून सुरु आहे.
समाजातील अनेक लोक समाजसेवा करतात. अनेकदा समाजसेवेचा अर्थ माहित नसणारे हवशे, गवशे, नवशे यात सहभागी होतात. समाजसेवेच्या नावाखाली आर्थिक उलाढाली होतात. समाजाच्या कामासाठी निधीही उभारला जातो पण त्याचा कितीसा फायदा समाजाला होतो हे त्या सामाज सेवाकालाच माहित…!
या सर्व चुकीच्या बाबींना फाटा देत प्रचार प्रसिद्धी या पासून दूर राहत केवळ लोकांच्या हितासाठी व आपल्या आत्मिक समाधानासाठी फोरमच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामाची उभारणी सुनेत्रा वहिनीनी केली आहे.
ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो … ज्या समाजामुळे लिहायला बोलायला शिकतो त्या समाजाचे उतराई होण्यासाठी जेवढे काम करता येईल तेवढे कमीच आहे असे वाहिनी सहज बोलून जातात.
बारामतीच्या या डोळस फोरम ने म्हणूनच समाजसेवा करणारांना देखील समाजाकडे, पर्यावरणाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे.
मागील पाच वर्षापासून हा फोरम निसर्ग संवर्धन संरक्षण करण्याबरोबरच गोर गरीब लोकांच्या डोळ्यांची दुखणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे . डोळ्यांचे ऑपरेशन मोफत करून देण्यासाठी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने सर पूर्ण वेळ येउन आपल्या जादुई हाताने लोकांचे डोळे तपासतात. आवश्यक त्या सर्व लोकांची ऑपरेशन करतात. ऑपरेशन सुरु असताना घरातल्या सद्स्यांसारख्या सुनेत्रा वाहिनी आपल्या सहकार्यांसह प्रतीक्षा कक्षात बसून असतात. राज्याच्या कानाकोपऱ्या येणारे गरीब वृद्ध स्त्री पुरुष यांची घरच्या लोकांसारखी किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळजी घेण्यासाठी फोरमचे सदस्य उपस्थित असतात. चहा जेवण नाष्टा लोकांना दिला जातो. हि सगळी कामे कर्तव्य भावनेने केली जातात.
डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ज्या डोळ्यांनी लख्ख दिसण्याची आशा मावळली होती त्या डोळ्यांना पुन्हा संजीवनी मिळाली. आता दुसर्याच्या आधारावर जीवन कंठ्ण्यापेक्षा स्वतः च्या उमेदीने जगत येईल. या विचारांनी त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव फुलतात. सुनेत्रा वाहिनी तुमच्यामुळे दिसायला लागले असे भारवलेल्या शब्दात सांगतात .
राज्यातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांच्यात भविष्यात 'डोळ्यांचे ऑपरेशन करणारी बारामती' अशी बारामतीची नवी ओळख निर्माण होईल.
'सुनेत्रा' या शब्दाचा अर्थ आहे 'सुंदर नेत्र '…कदाचित म्हणूनच नावाप्रमाणे आदरणीय वहिनींनी गोर गरीब लोकांचे डोळे सुंदर करण्याचा घेतलेला ध्यास घेतला आहे आणि म्हणूनच हा ध्यास त्यांना आत्मिक समाधान मिळवून देणारा आहे.
या फोरम मध्ये अनेक सदस्य अतिशय अत्मिक्तेने काम करताना दिसले. असे कार्यकर्ते वहिनींच्या बरोबर हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी झटत होते त्या सर्व शिलेदारांना वंदन…!
आपण सर्वजन मिळून हे जग सुंदर करू ……सुंदर डोळ्यांनी हे जग पाहू …!
बिपीन जगताप
९४०४१४०९८०
Social Plugin