निसर्ग संपन्न 'कमळ गड'
पावसाने धरणीमातेचा प्रत्येक कण उल्हासित झ्ाला होता. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील कमळाच्या आकाराचा कमळ गड अतिउंच किल्ला...किल्यांची उंची आणि सभोवलताचे दाट जंगल बघुन छातीत धड़की भरते. आजुबाजूला पसरलेली दाट कार्व्हीची झुड़पे मनाला प्रसन्न करत होती. सकाळी साड़े नऊ वाजता किल्याच्या पायथ्याला पोहचलो.
बलकवड़ी धरणाच्या अथांग पसरलेल्या जलाशयाला नमस्कार करुन किल्ला चढ़न्यास सुरुवात केली सर्व सहकारी तरुण होते उस्ताह आणि निसर्गाची आवड असणारे सारे जन कमळ गड कवेत घेण्यास निघाले होते. सकाळी उन चांगलच तळपत होते.त्यामुळे घामाच्या धारा चिंब करत होत्या पण पुढच्या दोन तिन तासात पाऊस भिजवनार याची ग्वाही देखील मिळत होती.
निसर्गाच्या जवळ खुप सौंदर्य असते पण आपण कधी ते जवळ जाऊन पाहत नाही. निसर्ग ला कवेत घेताना निसर्ग आपल्याला जपतो आपल्यावर प्रेम करतो. निसर्गाचे ऋण कधीही फिटनारे नसते.
डोंगर चढ़ताना दम लागत होता.श्वासाची गती वाढत होती..ह्र्दयाची धक धक जोरदार सुरु होती.. श्वास कितीही घेतला तरी कमीच पडत होता किल्ला चढ़ताना तुमच्या श्वासाची परीक्षा असते. तुम्ही या परीक्षेत पास झ्ाला तरच गड किल्ला तुम्हाला जवळ घेतो..म्हणूनच छत्रपति शिवाजी महाराजांचे गड कोट पाहण्यासाठी श्वास आणि छाती मोठी असावी लागते. साहस आणि जिद्द मनात असावी लागते.
कमळ गडाचा थोडा पायथा चढुन गेले की याचा प्रत्येय येऊ लागतो. दम घेत श्वास घेत आम्ही चढत होतो.दुधगावकर साहेब यांचे विशेष कौतुक होते न दमता ते निवृत्तीच्या वयातही खुप मोठा टप्पा पार करत होते.
आम्ही सर्व हळू हळू किल्ला चढ़त होतो.पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत उगवले होते. त्यामुळे पायवाटा बुजल्या होत्या नविन वाट शोधत आम्हीच नविन पायवाटा तयार करत होतो आमच्या मागच्या पिढीसाठी...!
रंगीत रानफुले वाऱ्याच्या तालावर नाचत होती.बेसुमार वाढलेली जंगली झुड़पी आणि गवत आंगाला घासत होते. निसर्ड्या वाटेवर सगळेच होतो. साथी हात बढ़ाना म्हणत सगळ्यांना हात देणारे माझे नवे मित्र हर्शल जोशी एकदम जोरदार होते.मोहिते साहेब निसर्गाचा आनंद घेत विसावा घेत चढत होते ..अनुसे साहेब म्हणजे प्रचंड उस्ताह एक सकारात्मक मानुस प्रत्येकात चांगल शोधनारा हा आमचा मित्र "चला उठा" म्हणन्यात आघाडीवर होता.
शासकीय मुद्रनालायचे खैरमोडे साहेब म्हणजे झक्कास माणूस... माणूस वयापेक्षा मनाने तरुण आहे याची प्रचिती देत होता.
खाडे साहेब ..बुधनकर साहेब आणि सर्वजण अगदी जोमात होते.
गड निम्मा चढला की खालचे दृश्य अप्रतिम दिसते..धरणाचे पाणी..डोंगर ..दऱ्या..पाहिले म्हणजे निसर्ग मनाला आनंद स्पर्श करतो. आभाळातून पडलेले पाणी जादू करते आणि ही जादू पाहण्यासाठी डोंगर कपारिचे सौंदर्य पहावे.
दोन तास चालत होतो आता मौसम बदलत होता..आभाळात काळ्या ढगांची दाटी होऊ लागली..अजून छान वाटू लागले.
गडाच्या एका टप्प्यावर पोहचलो अंगाला थंड वाऱ्याची झुळुक गुद्गुल्या करत होती. जाताना वोविध वनस्पतींची माहिती मोहिते साहेब व खाडे साहेब देत होतो. शेवटी वरती आलो आणि आश्चर्य वाटले गडावर एकच घर दिसले त्या घरी चहा घेतला. थोड़े पुढे गेल्यावर बिबट्याची विष्ठा दिसली वनाधिकारीनी त्यावर ती बिबट्याची असल्याबाबत शिक्कामोर्तब केले. कोल्हापुरच्या विद्यार्थ्यांची सहल नेमक्या वेळी गडावर होती. तरुण्यान्याचे वादळ गडावर घोंगावत होते.
कमळ गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहचताना दोन खडकांच्या मधून प्रवेश करावा लागला. अवजड लोकांसाठी ही चढ़ाई बिकट होऊ शकते.गडावर आलो तर समोर भगवा फड़कत होता. आनंद झ्ाला किल्ला चढून सर केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. गडावर तलवारीच्या आकाराचे खड़क फोडून भुयार आहे. त्याच्या आत शंकराचे छोटे मंदिर आहे. या ठिकाणी लाल माती आहे ती क्यालिशयम युक्त असल्याचे समजते.
आभाळातून पावसाच्या सरी पडू लागल्या चिंब भिजताना सारा थकवा वाहून गेला.
समोरच्या निसर्गाला कवेत घेता येत नव्हते एवढा विस्तीर्ण निसर्ग सौंदर्य पाहताना मन मात्र हरखुन गेले होते. जय शिवाजी जय भवानी म्हणत आम्ही त्या भगव्याला सलाम केला आणि आमचाच आम्हाला अभिमान वाटू लागला.

- बिपिन जगताप
9404140980
Social Plugin