Type Here to Get Search Results !

अंधारातून प्रकाशाकडे …।

 

गोष्ट एका प्रकाशाची ….!
 



पूर्व  दिशेला सूर्याचा तांबूस रंग तो न्याहाळत बसायचा …. हिरवेगार डोंगत तो एकटक बघायचा ….विविध रंगांची  फुले त्याला मनापासून आवडायची … तो जीवनाचा मनमुराद आनंद लुटायचा…  नुकतेच तारुण्यात केलेले पदार्पण त्याला  नवी  स्वप्न साकार करण्यासाठी उत्तेजित करीत होते . 
पण अचानक संकटांचे वादळ घोंगावत आले… मावळतीला जाणारा सूर्य  त्याच्या  डोळ्यातील ज्योत घेऊन जातोय असा भास होऊ लागला … आणि एक दिवस डोळ्यांना अंधुक दिसू लागले. अस्पष्ट पांढरा ठिपका त्याला सतावू लागला … रोज दिसणारे रंग अचानक गायब झाले. … तो धास्तवला …. घाबरला….  आणि आयुष्यातील एक मोठे संकट त्याच्या समोर 'आ' वासून उभे राहिले पण हे संकट त्याने धुडकावून लावले … नेत्र ज्योत विझत असताना त्याने त्याच्यातली आत्मज्योत पेटवली.…  डोळस माणसाला त्याने जगण्याची नवी दृष्टी दिली. 
हि कहाणी आहे वाई येथील गजानन दिक्षित या तरुणाची  वयाच्या २१ व्या वर्षी गजानन ची  नेत्र ज्योत  मंद होऊ लागली मेंदूकडे जाणारी नस अचानक काम करेनासी  झाली. डोळ्याच्या माध्यमातून पाहिलेली प्रतिमा मेंदूकडे जात नसल्याने समोर त्याला फक्त पांढरा ठिपका दिसु लागला. अनेक औषध उपचार झाले पण  सगळेच व्यर्थ गेले. पुढे उभे आयुष्य कसे जगायचे या विचाराने तो  वेडापिसा झाला पुढे कोणताही मार्ग दिसेना असे दुसऱ्यावर अवलंबून असलेले जीवन कसे व्यथित करणार  या सततच्या विचाराने गजानन  भांबावून गेला आणि अशातच त्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येऊ लागले. 
या  वेळी पुण्यात मामानी त्याला बोलावले.  जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देण्याच्या हेतूने  त्याला अंध शाळेत घेऊन गेले. आपल्या दुखः पेक्षा दुसऱ्याचे मोठे दुखः पहिले कि आपले दुखः संकट किती छोटे आहे याची माणसाला जाणीव होते त्याच प्रकारे गजानन ने  जन्मापासून अंध असलेली लहान मुल … मोठी माणस आपापली  कामे आनंदाने करताना अनुभवली  कोणाची कसलीही तक्रार नाही . 
 आपण  किमान उगवत्या सूर्याचा शेंदरी रंग पाहिलाय… गुलाबाच्या रंगाचा आनंद घेतलाय यांना रंगच माहित नाही यांच्या जीवनात ईश्वराने फक्त काळा रंग  भरलाय याची जाणीव गजाननला झाली आणि त्याने जगण्याचा वेगळा मार्ग गवसला  आणि त्या क्षणी त्याने ब्रेन लिपी शिकण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूचा विचार न करता तो झपाट्याने जिद्दीने तो उभा राहिला . शिक्षण माणसाला जगण्याची नवी उमेद देते असे म्हणतात आता शिक्षण घ्यायचे निर्णय झाला. त्याने डी एड पूर्ण केले. अंध अपंगांचा तो शिक्षक झाला. नगरपरिषद शाळेत त्याला  शिक्षकाची नोकरी लागली. नोकरी लागली तरीही तो शांत बसेना त्याने नंतर बी एड पूर्ण केले. नंतर एम. ए  पूर्ण केले. 
त्याची लहानपणापासून वकील होण्याची इच्छा होती त्याने साताऱ्यात लॉं कॉलेजला अडमिशन घेतले आणि आता तो वकिलीच्या  शेवटच्या वर्षाचे शिक्षण पूर्ण करतोय. विशेष म्हणजे हे सर्व शिक्षण तो फक्त ऐकून स्मरणात ठेवून पूर्ण करतोय. त्याची स्मरणशक्ती अफाट आहे. 
गजाननला आता  अर्थशास्त्रात पीएच डी करायचीय. त्यासाठी असणारया चाचणी परीक्षेत तो नुकताच विध्यापिठात ३८ व्या कक्रमांकाने पास झालाय. 
जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही संकट माणूस धुडकावून लावू शकतो हेच गजानन दिक्षित या तरुणाने दाखवून दिले आहे. माणसाला गरुडाचे पंख लावून गगन भरारी मारता येते पण ते बळ पंखात येण्यासाठी त्याच्या  रक्तात  उर्मी असावी लागते. 
गजानन यांच्या यशात त्यांच्या पत्नीचा हि सिंहाचा वाटा आहे. दररोज हि तेजस्वी बाई गजाननाला किमान दोन तास अभ्यासाची पुस्तके वाचून दाखवते. वाचलेले  स्मरणात ठेऊन गजानन परीक्षा देतो आणि पास होतो. 
 महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे चरित्र आपण वाचतो यात महात्मा फुलेंनी सावित्री ने शिकावे म्हणून  केलेले प्रयत्न आपना सर्वाना ज्ञात आहेत पण आजच्या आधुनिक सावित्रीने गजानन ने शिकावे म्हणून चालवलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत. 
अंध माणसांची 'स्टिक' न वापरता गजानन आत्मविश्वासाने चालतो. जगाला तो नवी दृष्टी देण्यासाठी चालतो …माणसाला जगण्याची प्रेरणा देतो.  संकटाना न घाबरता त्याला धैर्याने सामोरे जाण्यास शिकवतो. 

- बिपीन जगताप 
९४०४१४०९८०
Tags

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही संकट माणूस धुडकावून लावू शकतो हेच गजानन दिक्षित या तरुणाने दाखवून दिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही संकट माणूस धुडकावून लावू शकतो हेच गजानन दिक्षित या तरुणाने दाखवून दिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. गजानन,आत्महत्या करण्याचा विचार करणार्या प्रत्येकालाच तुझी कहाणी सांगावी.

    उत्तर द्याहटवा