Type Here to Get Search Results !

पुढच्या वर्षी लवकर ये.....!

पुढच्या वर्षी लवकर ये.....!



पंरपरेनुसार अनेक सण उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो.काळ बदलत गेला तसे उत्सव साजरे करण्याच्या पध्दतीतही मोठे बदल होत गेले.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या गणेश उत्सवाचे आधुनिक रुप आपण पाहत आहोतच.
रोजच्या संसारातील कटकटींना वैतागलेला..राजकीय सामाजिक प्रश्नांची उत्तर शोधाताना दमलेला माणूस मग अशा उत्सवातून जगण्याची नवी उमेद शोधतो.
माणूस आनंदाने जगण्यासाठी असे अनेक पर्याय शोधत राहतो. उत्सव हा सात्विक असला कि आंनदाला उधान येते.
सध्या सार्वजनिक साजरे केले जाणारे उत्सव मात्र सामाजिक डोकेदुखी ठरत आहेत. मंडळाच्या तिव्र स्पर्धा ...त्यातून होणारे वाद ...कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न ...सगळ्याच गोष्टी मग हाताबाहेर जातात.
गणेशउत्सवात पोलिसांवर मोठा ताण असतो. जागता पहारा ठेवत बाप्पा सारखे ते देखिल विसर्जनाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतील. त्यात यंदा शांताबाईने शांतता हरवली आहे.
प्रत्येक धार्मिक सण..उत्सव ..जयंत्या ...पुण्यतिथ्या सध्या अशाच साजरे होतात यालाही काही अपवाद आहेत .काही मंडळे सामाजिक काम करतात लोकहिताच्या कामाला प्राधान्य देतात .
पण मोठ्या प्रमाणात असे का होते असा प्रश्न कोणी विचारला तर एकच उत्तर मिळेल 'आम्ही त्यांच्या पेक्षा मोठे आहोत' हे दाखवण्यासाठी ...या सगळ्या बाबी समाजात तेढ निर्माण करतात. माणसाला माणसापासून दूर नेतात.
आज गणेश विसर्जन होत असताना आपण आपल्यातला अहंकार विसर्जित करु या.....बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये पण तुझ्या येण्याने आनंदाची भरती येते तसे माणसाचे माणूसपण बहरु दे...प्रेमाची कांरजी उडू दे....!

          - बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.