Type Here to Get Search Results !

हरवलेल्या बालपणीची गोष्ट.

हरवलेल्या बालपणीची गोष्ट.

..!

उन्हाळ्यात अंगाला गार वारा लागायचा आणि अंगणात अंथूरणं पडायची ...लेका,लेकीची दहा पाच नातवंड ओळीत झोपायची मग टपोर्या चांदण्या बघत गोष्ट रंगायची आजी नातवंडाच्या या श्रीमंतीन हरखुन जायाची.
घरातले वयस्कर 'आला उन्हाळा पोरं सांभाळा' म्हणायचे याचं कारण म्हणजे  दिवसभर पोरांचा पाय घरात नसायचा. आंबे , जांभळ,  झाडावर चढून तोडायची शर्यत लागायची. पोरं झाडावरुन पडायची, लागायचं अजून घट्ट ह्वायाची.
अंगणातल्या मातीचा फुफाटा पोरांना न्हावू घालयचा...मातीची मडकी हिरव्या,निळ्या, गोट्यांनी भरुन जायाची. अंगणाला आणि घराला उन्हाळ्यात उत्साहाचं उधान यायंच .
ओसरीला येणाऱ्या चिमण्यांची चिवचिव आणि घरातल्या पोरांची कलकल थोरा मोठ्यांना झोपू देत नसायचे.  या पोरांची शाळा कधी भरायची असा प्रश्न थोरा मोठ्यांना पडायचा पण तरीही तो गलका सगळ्यांना आतून मात्र आवडायचा.
मामाचं गाव त्यावेळी भाचे मंडळीचंच होऊन जायांच..गोट्या.लगोर, आणि सुर पारंब्या, चंपुल्या, गजग, दगडी काचा, वांग टांग, लंगडी, हे सगळे गावाकडचे उन्हाळी खेळ पोरांना घरात बसू देत नव्हते.
उन्हाळ्यातील दुपारच्या उकाड्याने हैराण झालेली सगळी मूलं नदीवर, विहीरीवर पोहायला जायाची. नविन पोहायला शिकण्यासाठी आमच्या लहानपणी उन्हाळ्यासारखा दूसरा मुहूर्त नसायचा. पाठीवर मोठा वाळलेला भोपळा अथवा ड्रम बांधला कि नवशिक्या पोहणारा जग जिंकल्याचा अविर्भावात पोहायचा.
या दिवसात जेवायचं, पोहायच, खेळायचं या त्रिकुटात संगळा उन्हाळा निघून जायाचा.
त्या वेळी देखील आजच्या सारखा उन्हाळा कडक असेलही पण तो या खेळात जाणवायचा मात्र नाही.
मागल्या आठवड्यात गावाकडं  जाणं झाल आणि एकाचवेळी  हूरहूर आणि दूख: ही झालं, गावाकडच्या अंगणातील खेळणारी लहान मोठी पोरं घरात होती. अंगणा आता ओस पडलीत....मामाची गाव आता लांब गेलीत......गोट्या, लगोर्या, लपाछपी,चंपुल्या, गजगं, सुर पारंबी आता कुठ शोधूनही दिसत नव्हती...मात्र घरात मोबाईलवर सगळी मुल मोबाईल्स गेम   खेळत होती. धावत नव्हती, पळत नव्हती, पडत नव्हती. ओसरीवर येणार्या चिमण्यांची संख्या ही मागल्या काळात झापाट्याने कमी होतेय.मुलं खेळतच नाहीत हे पाहून चिमण्याही घराकडे सध्या फिरकत नाहीत.
या मुलांकडे बघून बालपणाची काळ सुखाचा असं आता खरचं वाटत नाही.  आभासी जगतात तो काळ आज हरवून गेलाय.
'आला उन्हाळा तरी पोर का बरं खेळना' या काळजीन आजी आता चांगलीच धास्तावली आहे. तीचा नातू आता उन्हात तान्हात जात नाही. नदीच्या विहीरीच्या पाण्यात पोहत नाही. आंब्याच्या झाडावर चढून कैरया काढत नाही, अंगणातील फुफाट्यात गोट्या लगोर खेळत नाही.
हरवलेल्या बालपणाला अंगण शोधतंय. आजीची गोष्ट आणि आकाशातला चांदोबा आतुरतेने खेळकर नातवंडांची वाट पाहतयं.
जग बदलतयं....डिजीटल होतयं..पण व्हाटसआँप, फेसबूक, आणि मोबाईल गेम्स गावाकडची अंगणातील खेळण गिंळकृत करतय. आभासी जगात रमणार्या या तरुणाईला अपंग बनवतय. पुन्हा चिमयांची चिवचिव आणि पोरांची कलकल ऐकू आली पाहीजे उन्हाळ्याची वडाची सावली हसली पाहीजे.

हरवलेल बालपण पून्हा खेळणार -
मोबाईलमध्ये हरवलेल्या बालपणाला पुन्हा जिवंत करण्याची आनोखी संधी पुन्हा  येणार आहे. आदरणिय सुनेत्रा अजित पवार* (वहिणीसाहेब) यांच्या संकल्पनेतून पुन्हा मातीतल्या गोट्या, लगोर्या,जिवंत होणार आहेत.  पुन्हा बालपणीची तीच मजा तोच आनंद मिळवून देण्यासाठी विद्या प्रतिष्ठान आणि इन्व्हारमेंटल फोरम आँफ इंडीया या संस्थाच्या माध्यमातून हा अनोखा कार्यक्रम आयोजीत केला गेला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या भल्या मोठ्या अंगणात मातीतले खेळ रंगणार आहेत.रविवार  दि.४ जुन ला सकाळी ६ ते १० या वेळात आपल्या मुलांना या खेळात सहभागी करा. आणि हरवलेलं बालपण पुन्हा मिळवा.
- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.