मातीशी एकरूप झालेला सुपरस्टार
"तो हिरो आहे..जानू आहे....रंगीला आहे....तरीही तो माणसातला माणूस आहे...! होय तो सिनेमासृष्टीतील सुपरस्टार आहे...पण माणसात सहज मिसळून जाणारा....जमिनिवर घट्ट पाय रोवून उभा असलेला तरीही आभाळापर्यंत पोहचलेला हा जँकी श्राँफ आहे".
आज राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात बाँलीवूड सुपरस्टार जँकी श्राँफ यांनी भेट दिली.मंडळाचे अध्यक्ष मा.विशाल चोरडिया सर यांनी ही भेट घडवून आणली.
मागील चाळीस वर्षापासून ते हिंदी सिनेमासृष्टीतील सुपरस्टार आहे. आजअखेर त्यांनी १० भाषेतील २०७ चित्रपट केले आहेत. लातूर येथील उदगीर येथे जन्मलेले जयकिशन काकुभाई श्राँफ म्हणजेच जँकी दादा महाराष्ट्राची शान आहे. साधेपणाचा ठेवा आहे.
'हिरो'या चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण केलेले जँकी श्राँफ खर्या अर्थाने हिरो आहेत. लोकांच्या मनातील जग्गूदादा आहेत.
चित्रपटातील कलाकरांबाबत लोकांना नेहमीच आकर्षण असते. अनेकदा हे कलाकार सहजासहजी कोणालाही भेटत नाहीत म्हणूनच त्यांना तारे म्हणतात.उंच आभाळातील तारे सर्वांना दिसतात पण ते हाताला कधीही लागत नाहीत. अनेकदा सर्वसामान्य त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात पण ते जवळ कधी येतच नाहीत.
जँकी श्राँफ म्हणजे साधा सरळ माणूस... माणसात सहज वावरणारा...लोकांचा आदर करणारा...प्रत्येकाला आपुलकीने बोलणारा कलाकार...!
'क्या भिडू ,..क्या चल रहा है..अशा आपल्या मातीतल्या शब्दात बोलणारा हा अभिनेता सर्वोत्तम आहे. हृद्यातील माणुसकीची पणती अखंड तेवत ठेवणारा हा माणूस प्रेमळ आहे.
हिंदीतील आंदर बाहर,जानू, कर्मा, राम लखन, खलनायक, गर्दीश,परींदा, रंगीला, आग्नीसाक्षी, ते देवदास अशा शेकडो चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे जँकी श्राँफ खर्या अर्थाने सुपरस्टार आहेत.
आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर अनेक कर्मचारी जँकी दादांबरोबर फोटो काढण्यास धडपडत होते हे पाहून जँकी श्राँफ यांनी स्वता:हून प्रत्येका बरोबर फोटो काढले. कोणताही सुपरस्टार चा स्टारडम न बाळगता हा माणूस जमिनीवर खाली बसला.
अनेक पुरस्काराने सन्मानीत जँकी दादांना पाहण्यासाठी अवघ्या काही क्षणात शेकडो लोक जमले. प्रत्येकाला क्या भिडू म्हणत हा माणूस लोकांना हात देत होता. जग्गू दादा भेटल्याचे सुख सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होते.
नैसर्गिक शेती करणारे ज़की श्राँफ मातीवर आणि माणसांवर प्रेम करतात. झाडं वेली, फुल प्रेमाने वाढवतात. वसुधंरा फांउडेशन या नावाने सामाजिक संस्था चालवितात.
आज मी खरा 'हिरो' पाहिला. चेहऱ्यावर माणूसपणाचे तेज असणारा हा रंगीला हिरो...मनाला खुप भावला.....मनापासून आवडला...!
- बिपीन जगताप