Type Here to Get Search Results !

माझ जगणं अस असावं.

 माझ जगणं अस असावं


माझ जगणं अस असावं
सगळ सुंदर मला दिसावं

माणूस म्हणून जगताना
निसर्गावरही प्रेम जडावं
माझ जगणं अस असावं
प्रत्येकाचा आधार व्हाव
हात दिलेल्या हाताला
जगण्याचं सामर्थ्य यावं
माझ जगणं अस असावं
निर्झरासंगे वाहत रहावं
वनराईच्या पानाफुलात
जिवनगाणं गात रहावं
माझ जिवनं अस असावं
आपलं नात कायम रहावं
माया ममतेच उधान यावं
प्रेमाने हृदय चिंब भिजावं
माझ जिवनं अस असावं
आईचं हृदय मला मिळावं
प्रत्येकाला लेकरु समजून
प्रेमाने कवटाळून घ्यावं
माझ जगणं अस असावं
जनसेवेत सारं निघून जावं
आयुष्याच्या संध्याकाळी
कापरासारंख उडून जावं
- बिपीन जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.