जिवन सुंदर आहे.
नाम घ्यावे नाम द्यावे
सदगुणात रंगून जावे
श्रवणाचे कसब शिकावे
मनातले सांगत रहावे
धरतीवर प्रेम करावे
आभाळाचे होऊन रहावे
कणकणात सामावून जावे
आनंदात न्हाऊन निघावे
सख्याची संगत धरावी
अनंत काळापर्यंत जावी
क्षितीजाची सिमा ओलांडून
आभाळापर्यंत पोहचावी
जिवन सुंदर जगावे
आनंदाचे दाते व्हावे
प्रत्येकाच्या हृदयात
इश्वराचे दर्शन घ्यावे
- बिपीन जगताप