आयुष्यभर विध्यार्थ्यांना मूल्यांची शिकवण देत त्यांनी आपले जीवन विध्यार्थी घडवण्यात खर्ची केले. नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वडीलांचा हजार पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेतले आहे म्हणून शासकीय मुद्रणालयाचे संचालक रुपेंद्र मोरे यांनी हा आनंददायी 'सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा' साजरा केला. आजच्या काळात नाती संपुष्टात येत असताना आपल्या वडिलांविषयी असे आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते जपणारी माणसं तशी दुर्मिळच ..समाजात वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना असा कृतज्ञेचा सोहळा आई वडिलांची सेवा करण्याची प्रेरणा देतो.
आकाशात चंद्र जसा शीतल लोभस मनाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारा तसेच आप्पा देखील ..!!
आप्पा दिनेश मोरे यांचा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा कुटुंबासाठी भावनिक सोहळा होता. रुपेंद्र मोरे यांचे बंधू विनायक यांनी आप्पांचा हा सोहळा करायचा आहे असा निश्चय केला. आप्पांविषयी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्याचा त्याचा आग्रह सर्वानी मनोभावे मान्य केला आणि नुकताच नाशिक मध्ये हा सोहळा साजरा झाला.
आप्पांची संपूर्ण सेवा मुलं घडवण्यात गेली संस्कार आणि स्वावलंबी बनवण्यात गेली. अनेक मुलांना आप्पानी प्रेम देत ज्ञान ही दिले. कुटुंबातील सर्वांना प्रामाणिक कामाला जगात मान्यता असते याची शिकवण तर दिलीच पण कष्टाला शॉर्टकट नसतो हे देखील मनावर ठसवले.
मुलांची जडण घडण करताना तुटपुंज्या पगारात आप्पानी आयुष्यभर पुरेल एवढी मायेची शिदोरी दिली. म्हणूनच हा सोहळा करताना सर्वांच्याच भावनांना भरती येत होती.
आज जगात कुटुंब व्यवस्था ढासळत असताना एकत्रित कुटुंबांनी घरातील जाणत्या माणसाला दिलेलं हे प्रेम अनेकांसाठी कौतुकास्पद होते.
आप्पांचा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मोरे साहेब यांची आई (लीलावती मोरे )आनंदाश्रू ने डबडबलेल्या डोळ्यांत साठवत होती. आईने आप्पांच्या प्रत्येक सुख दुःखात यशस्वी साथ दिल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. लेकरांनी आई वडिलांबद्दल केलेली हि कृतज्ञेची भावना हा सोहळा जगातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याची जाणीव तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.
हजारो पौर्णिमा पाहणारा प्रत्येकजण हा आयुष्यातील अनेक घटनांचा साक्षीदार असतो. अनुभवाची शिदोरी घेऊन तो मुलाबाळांना देण्यासाठी तो तयार असतो पण ते सहज घेण्याची प्रवृत्ती माणसाकडे असणे गरजेचे आहे नाही तर हि अनुभवाची विद्यापीठे अशीच संपून जातील.
यावर मोरे साहेब सहज बोलून गेले "मला हा सोहळा पाहताना आप्पांविषयी काय बोलावे कसे सांगावे यासाठी शब्दांची सांगड घालता येत नाही पण डोळ्यातील आसवांना आणि मनातील भावनांना शब्दांची गरज नसतेच ना "..!!
- प्रिय मित्रवर्य आणि राज्याच्या शासकीय मुद्रणालयाचे प्रमुख रुपेंद्र मोरे साहेब यांचे आप्पा हे वडील आहेत.
Khup Chan
उत्तर द्याहटवाThanks
हटवाखूपच सुंदर अणि मोजक्या अशा शब्दात आप्पांचे वर्णन केले आहे.
उत्तर द्याहटवाआप्पांना यापुढे ही निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....