Type Here to Get Search Results !

उत्तम कवी ते संवेदनशील अधिकारी

 



शब्दांचे आणि त्यांचे नाते अगदी घट्ट आहे. लोकांची संवेदनशिलता ते जाणतात प्रत्येकाशी हसून बोलणे आणि त्यांना  काळजाच्या कानाने ऐकणे हे त्यांना अवगत आहे. साहित्याच्या क्षेत्रात ते जेवढे सहज वावरतात तेवढीच सहजता त्यांच्या वागणुकीत आणि  बोलण्यात देखील आहे.

'सतीश मोघे' हे नाव राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात यामुळेच सुप्रसिद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा पवार यांचे ते सध्या प्रशासकीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 

अजित दादा एक प्रॅक्टिकल नेते आहेत. विकासपुरुष आहेत. दादांची प्रशासनावर पकड आहे आणि त्यामुळे त्यांचा दरारा देखील तेवढाच मोठा आहे. दादांच्याकडे काम करणे तेवढे सोपे नाही पण आदरणीय दादांनी मोघे साहेबांची प्रशासकीय सल्लागार या पदावर निवड केली आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मोघे साहेब  तेवढ्याच वेगाने कार्यरत आहेत.

कविता किती अर्थपूर्ण आणि लयबद्ध असू शकते हे पहायचे असेल तर या पेजला नक्की भेट द्यावी लागेल.

नवरात्रीच्या नव रंगाच्या कविता,कुपी अत्तरी

 https://www.facebook.com/share/165HyGMw9Z/?mibextid=wwXIfr  

मोघे साहेब यांच्या फेसबुक पेज वरील  साहित्य मनाला भुरळ घालणारे आहे. वाचनाची गोडी वाढवणारे आहे. 

'कुपी अत्तरी' हि शब्दांच्या सुगंधाची  लयलूट करते आणि मानवी मनाला कस्तुरीची अनुभूती देते. 

संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात अभंगात शब्दांचे महत्व सांगितले आहे.

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं || शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां || तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करू || 

या अभंगातील उक्ती प्रमाणे मोघे साहेब कार्यरत आहेत. शब्दांच्या आभाळात अखंड विहार करणारे आणि नेमके अर्थपूर्ण शब्द धुंडाळून आपल्या झोळीत टाकणारे ते शब्दप्रभू आहेत.

म्हणूनच मोघे साहेब यांच्या साहित्यांचा मी चाहता आहे. मोघे साहेब यांच्या कविता मंगेश पाडगावकर यांच्या कवितांच्या जवळ जाणारी आहे.

लेखक संवेदशील असतो समाजाची जान आणि भान त्याच्याजवळ असते असे भान ठेऊन सामाजिक समरसता आणि सामाजिक एकोपा जपणारी मोघे साहेब यांची कवीता रसिकांना आपली वाटते.

प्रशासकीय अधिकारी असलेले मोघे साहेब निसर्गप्रेमी कलासक्त साहित्यिक आहेत पण त्यापेक्षा एक चांगला माणूस आहेत. माणसाला आपलेसे करणारे प्रत्येकाला आपला वाटणारा हा माणूस प्रेमळ आहे.

आदरणीय साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!! आपले आनंदाचे झाड असेच बहरत राहो हि सदिच्छा ..!!


-बिपीन जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.