Type Here to Get Search Results !

हसणे ह्रदयाचे बोलणे

हसणे सहज असावे, मनाला आनंद देणारे 
नको ठेच देणारे ह्रदयाला घाव घालणारे 

हसणे असते  ह्रदयाचे बोलणे  
मनातील आनंदाला जन्म देणे  
हसण्याने निखळ प्रेम वाढते
माणसाला माणसाशी जोडते 

कधी कधी माणस खोटेपणाने हसतात 
येणाऱ्या लोकांची टिंगल टवाळी करतात 
एखाद्याला देवाने दिलेला नसतो पाय 
तरीही टवाळकी करणारे हसत जाय

   अशा माणसाना काय हसणे कळले 
  माणसांचे माणसाशी नाते समजले ?
  पहा एकदा ह्रदयातून स्वच्छ हसून 
  दुसऱ्याच्या काळजात सहज घुसून 

हसणे असावे सहज सुंदर प्रेमान भरलेले 
माणसाच्या ह्रदयातील काळीज जाणलेले 
हसण्याने मग परका माणूस आपला होईल 
ओंजळीतील सुखाची फुले आपल्याला देईल 

                                     -  बिपीन जगताप 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.