Type Here to Get Search Results !

मैत्री एक मुक्त सवांद ...!

मैत्रीचे धागे घट्ट प्रेमाचे असतात 
विचारांच्या संवादातून जुळून येतात 
मैत्री म्हणजे फक्त सहवास नसतो
दोन जीवांचा मुक्त सवांद असतो 

रुसवे, फुगवे सहज जमतात  
तरीही मने तिथेच रमतात 
पण मैत्री फक्त माणसाची नसते 
 विश्वातील साऱ्या सजीवांची असते 

मनाचे डोळे सताड उघडायचे 
नजरेच्या थोड लांब बघायचे 
जगात ज्यांना कोणी नसते 
त्यांना मैत्रीची गरज असते 

कृष्ण सुदाम्याची मित्र कहाणी 
एक उच्च तर दुसरी साधी राहणी 
अनोख्या मित्र प्रेमाचा आदर्श आहे 
 ह्रदयाच्या प्रेमाचा झरा अखंड वाहे 

मैत्री करा निसर्गाशी 
निसर्गातील प्रत्येकाशी 
मैत्री एक अलाह्दायक स्पर्श मनाचा 
मैत्री एक अनोखा ठेवा जीवनाचा  

                              -- बिपीन जगताप 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.