Type Here to Get Search Results !

माझ्यातला मी ...!











माणसांच्या दुनियेत मी मश्गुल आहे
जायचे परत मजला मी विसुरून आहे
दुनिया हि  रंगांची मनाला भुरळ पाडते
नाती हि रक्ताची माया तोडू न पाहते !

किती समजावले  मी माझ्या मनाला 
कितीदा दिली ताकीद माझ्या ह्रदयाला 
मजला माहित आहे हे माझे कोणी नाही 
तरीही मी आणि माझे कसे जोडून पाही !

एकटाच मी या जगात फिरतो आहे
विश्व निर्मात्याची दुनिया पाहतो आहे
मजला कधी न कळला हा गंध मातीचा 
प्रकाश पडला मग त्या आतल्या वातीचा !

आता जाईन पुन्हा मी माझ्या घरात 
घेईन विचारून त्या वेडाच्या भरात
मजला कोण म्हणू मी सांग  एकदा  
माझ्यातला मला तू  शोध एकदा !

-- बिपीन जगताप 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.