त्याच्या असण्याला एक ओळख असावी आणि लोकांनी त्याला ओळखावे हि एक मनाची भूक माणसाची असते. त्यासाठी मग अनेक प्रयत्न केले जातात. वंश संकल्पना त्यातूनच निर्माण झाली. आपले कोणीतरी पुढच्या काळातही असावे. आपले नाव अमर असावे असे अनेक राजा महाराजांना वाटते. आणि तसेच ते गरिबाला हि वाटते. या वाटण्यात तशी काही चूक नाही. त्यामुळे जगात प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे.
उदाहरण द्यायचे म्हटले तर मी काही कविता लिहितो म्हणजे मी कवी नाही पण तरीही लिहण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कविता दुसऱ्याने वाचाव्यात त्यावर प्रतिक्रिया द्यावी. अशी एक सर्वसामान्य स्वाभाविकता माझ्यातही आहे. फेसबुक वरील अनेक लेखन मुळात याच हेतूने केलेले असते. असे मला वाटते. पण मला आश्चर्य वाटते त्या लोकांचे जे आपले नाव बदलून फेसबुक वर अक्षरशः धिंगाणा घालत आहेत. अपरिचित जीवन जगात आहेत. असे जगणे मला तर फार अवघड वाटते. आपले अस्तित्व पुसून एका दुसर्या नावाने राहायचे इवढे सोपे नाही. या सर्व लोकांना कदाचित अधात्मातले जरा जास्त माहिती असेल किंवा कोण्या एका साधू महाराजाकडून यांनी गुरु बोध घेतला असावा.
आज मोठ्या प्रमाणात आपले नाव बदलून लोक या फेसबुक वर दिसत आहेत. अपरिचित जीवन जगणारे असे कितीतरी नाव सध्या दिसत आहेत. निसर्गाची आत्मीयता असणारे काही जन एक फुलपाखरू, निसर्ग मित्र, होतात. तर माणसाच्या मनाशी एकरूप होणारा मनकवडा हि दिसतो. तसेच तुमचा बंड्या, महागुरू, फेसबुक चा एक्का, फेसबुक डॉन, अशी नवे धारण करून काही जण आपले जीवन जगत आहेत. तर काही पांचट नाव घेऊन आपले जीवन व्यथित करत आहेत. या सगळ्यांना आपल्या खरया स्वरुपाची ओळख जगाला करून द्यायची नाही पण जगाचे सुख दुखः वाटून घायचे आहे. प्रसिद्धी पासून खऱ्या अर्थाने लांब राहून जगाला आनंद देणे हे कदाचित त्यांना अभिप्रेत असेल. अशा सर्व चांगल्या जीवन जगणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
पण काही पांचट मंडळी आपले रूप झाकून दुसऱ्या रूपाने जगाला छळत आहेत. एखाद्या मित्राने लिहेलेल्या कविता अथवा लेखावर घाणेरडे अभिप्राय देऊन आपली ओळख करून देत आहेत. आणि अशा मित्रांना काही बोलावे असे मला वाटत नाही पण त्यांच्यातही काही चांगले गुण आहेत. ते त्यांनी पाहावे. आपल्या अस्तित्वाने हे जग सुंदर करावे. एवढी माफक अपेक्षा त्यांचाकडे करावीशी वाटते.
या सर्वाना आपण आदराने बोलणे आवश्यक आहे. कारण ते स्वतःला विसरून एका नव्या नावाने जगत आहेत. आपले महत्व न सांगता ते त्या नावाला महत्व देत आहेत. अशा सर्व मंडळीना खूप खूप शुभेच्छा ..!
एक सकारात्मक लिखाण करून लोकांना प्रेम आणि आनंद देऊ या ..असा संकल्प करून जीवनात पुढे जाऊ या...!
-- बिपीन जगताप