माझ्या तुझ्या प्रेमाला बंधन नसते
तुझ्या मिठीत मी विरघळून जाते !
काया तुझीच आहे पण मन हि तुझेच रे
तुझ्या असण्याने हे जीवन माझे फुलते रे !
कितीदा कसे सांगू माझ्या मनाची आस
तुझ्याच साठी नटले रे बनले आज खास
काय सांगू तुला मी माझं तुझं नात
तूच आहेस माझ्या जीवनाची वात
माझ्या ह्रदयात आहे फक्त तुझीच मूर्ती
तुझ्याचमुळे झाली माझ्या जीवनाची पूर्ती !
माझ्या मनी ध्यानी तूच कसा रे
माझ्या ह्रदयी फक्त तुझाच वसा रे !
-- बिपीन जगताप