भारत माता आज खूप आनंदून गेलीय
पुन्हा एका क्रांतीची सुरुवात झालीय
लहान,तरुण वृध्द आता उभा राहतोय
ह्रदयातून वंदे मातरम पुन्हा गातोय !
या साठीच फक्त प्राण आहे माझा
या देशाला आम्ही माता म्हणतो
तिच्या दुधाचे उपकार मानतो !
साऱ्या जनतेला आज देश समजलाय
मातेला तिचा हरवलेला पुत्र मिळालाय
मातेच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या
पुन्हा गतकाळाच्या स्मृती जागवल्या !
भारत देश साऱ्या जगाच्या वरती
देश वाचवण्यासाठी बलिदान केले
तरच जन्म मरण सार्थकी झाले !
कधीच नाही माता, माझी वांझ राहिली
अनेक नर रत्ने तिने देशाला वाहिली
अशा लोकांनीच पुन्हा मशाल पेटवली
नवा विश्वास नवी अशा पुन्हा जागवली .............!