सावली माझी मायेची
खूप वेदना सहन करते
ममता माझ्या उरी भरते !
आई माझी काळजीची
काळजात जाऊन बसलेली
खूप दमून गेलेली तरीही
नजरेत शांती घेतलेली !
आई माझी हक्काची
बोलणे सहज झेलणारी
कितीदा रागावून बोललो तरी
हसत हसत सांगणारी !
आई माझी सुखाची
वेदनेला ओ देणारी
कितीही दुखः आले तरी
सहज झेलून घेणारी !
आई माझी देवाची
माया ममता देणारी
लेकराचे अपराध पोटात
घेत जीवन जगणारी !
-- बिपीन जगताप