Type Here to Get Search Results !

तुझ्यासाठी बाबा रोज मरतो...!




















बाळा तुझ्यासाठी बाबा तुझा रोज मरतो
तुझ्या सुखासाठी तो घाम गाळतो
त्याच्या जीवनात आता तुला शोधतो 
त्याच स्वप्न आता तो तुझ्यात पाहतो 

जीवनात थोडा थोडा स्वार्थ करतो 
बाळासाठी आपल्या घर बांधतो 
तुझ जगण तो सोप करतो 
कर्तव्याच्या पुढे तो जात असतो 

रानातला काटा कधी रुतला पायी 
बाबाच्या काळजात चर्र  होई 
तुझ्या साठी कधी बाबा अंगाई गातो 
लेकराला उराशी कवटाळून झोपतो 

माया ममता सारी माझी आठव कधी 
तुझ्या नजरेत मला दिसेल कधी 
तुझ्या हितासाठी मी सारे करतो 
 तुला पुढे नेण्यासाठी रोज मरतो 

बाळा कॉलेजात गेल्यावर विसरू नको 
 श्रीमंतांच्या  पोरांसारखा वागू नको 
तंबाखू विडी सिगरेट ओढू नको 
बापाला खाली मान घालय लावू नको 

तुझ सुख देवाकडे रोज मागतो 
तुझ्यासाठी  सार सहन करतो 
तुटक्या चपलांना माझ्या पाहू नको 
डोळ्यात आसव आणू नको !


--  बिपीन जगताप 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.