जीव जडला तुझ्यावर अनंता
जीवाला जणू आस लागली
परमात्म्याची गोडी लागली !!१!!
ह्रदयाच्या आत निर्मळ झरा
अंतरीच्या देवाचा वास खरा
तुला कुठे शोधू आदिनाथा
टेकवतो तुझ्या चरणी माथा !!२!!
किती गोड तुझे निरामय रूप
अंतरात माझ्या सुगंधी धूप
आनंदाने ह्रदयात लावू पणती
नामाचा महिमा भक्त सारे गाती !!३!!
देव आणि माणूस नसे वेगळा
अंतरीच्या भावनांचा खेळ सगळा
भेटू परमात्म्याला करू हर्ष सोहळा
पैलतीरी घेऊन जाऊ भक्तांचा मेळा !!४!!
ईश्वराच्या पायी लीन दिन होऊ
माणसात देवत्वाचा शोध हा घेऊ
संसार सागर ओलांडून हा जाऊ
पशुत्वाची लक्तरे सोडुनिया देऊ !! ५!!
-- बिपीन जगताप
Social Plugin