Type Here to Get Search Results !

कट्टा....


                                                              कॉलेज कट्टा....




एक कट्टा, एक रट्टा , दिवसभर चालायचा 
दोस्तांच्या गप्पांचा फड ऐन रंगात यायचा 
कशी दिसते, कशी हसते ; 
चालताना माझ्याकडे नेत्र कटाक्ष टाकते 
एकच  पोरगी सगळ्यांच्या मनात कशी बसते 
हाच विषय रुतून असायचा आमच्या अड्ड्यावर 
दंगा मस्ती करणाऱ्या पोरांच्या कट्ट्यावर ......!

"परीक्षा आली..'आली  तर येऊ दे'
आलीच तर पुढे तशीच निघून जाऊ दे ..! 
वेळ आहे अजून म्हणावं
'अभ्यास करणाऱ्या निर्बुद्धानो 
काही तरी शिका आमच्याकडून 
अज्ञानी बांधवानो' ..'! 
असा कट्टा आमचा बोलायचा 
शिट्टी जोरात फुकायचा 

 सरळ वाकडी वळण 
घेत आम्ही सारे चालायचो 
नवी कोरी बायिक घेऊन 
  हवेत उंच उडायचो 
मान वाकडी करून 
कट्टा सारा हसायचा 
टाळ्या देत पोरींकडे 
निर्लज्जपणे बघायचा 

सांस्कृतिक महोस्तवात 
 खूप मजा करायचो 
रंगीत संगीत सारे 
वातावरण करायचो 
मग त्यात  नवी दोस्ती 
नाजूक सुंदर जमायची 
एकच गाणी दोन्ही बाजूने 
नकळत  मग रंगायची 
पुन्हा हवा हवा वाटणारा 
नवा दोस्त कट्ट्याला मिळायचा 
हसत मनातले बोल मग आमच्याशी बोलायचा 

आज खूप वर्षांनी कट्टा मज आठवला 
काय असेल तिथे पहाया जीव आतुरला 
सहज वेळ काढून कट्ट्याजवळ गेलो 
पानगळ झालेल्या झाडाखाली एकटाच विसावलो 
आठवणींनी मनात गर्दी केली 
टपोऱ्या दोस्त्यांची याद आली 
शुष्क झाडाच्या पर्णावरती 
नकळत डोळ्यातील आसवे गळली
ह्र्द्यानी दोस्तांना पुन्हा साद घातली 
चला कट्ट्यावर जमायची
 गड्यानो वेळ पुन्हा आली ......! 

-- बिपीन जगताप