Type Here to Get Search Results !

सावळा कान्हा........


निळा काळा सावळा 
नेसला पितांबर पिवळा 
मन मंदिरी उभा राहिला 
ह्रदयी आज मी पहिला !!

श्रीहरी सखा झाला 
 ह्रदयी माझ्या बसला 
काळोख अंधार संपला 
नवा दिवस उजाडला  !!




हाती घेऊन मुरली 
तहान भूक हरली 
गुरे गाई हंबरती 
धावत कान्हाकडे येती !!

 सखा सावळा गोपिकांचा 
 रंग उधळी प्रेमाचा 
खेळे यमुनेच्या तीरावर 
उभा काळसर्पाच्या शिरावर !! 

राधा झाली आज बावरी 
उडे केसाची बट वाऱ्यावरी
धावत शोधे श्रीरंगाला 
पंढरीच्या त्या पांडुरंगाला ...!!

-- बिपीन जगताप