Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही


                                                     
 सांग वाट कशाची पाहते...!













खोल ह्रदयाच्या आत 
प्रेम पाझरते 
गोड मनाच्या आत 
साजणी अवतरते !!

डोळ्यांच्या सागरात 
 प्रेम वाहत राहते 
मनाच्या कोंदणात 
प्रियेची तसबीर बसते  
 
तुझ्या काळजात माझं
रूप बघ असेल 
तुझ्या ह्रदयात माझं 
नाव का गं गोंदल ? 

बघ डोळ्यात तुझ्या 
प्रेम उठून  दिसेल 
तुझ्या ओठांवर 
माझं नाव गं बसेल !!

सांग आता वाट 
कशाची गं पाहते 
माझ्या अंतरात 
उगी धड धड वाढवते !!

-- बिपीन जगताप