अखंड भारत...माझा भारत !
भारत माता कि जय बोलू आम्ही अभिमानाने !!
या मातीतून फुले फुलावीत सुगंध देऊ आभाळाला
काम करू या, घाम गाळू या, देखणे करूया देशाला !!
अखंड भारत, माझा भारत, सांगू साऱ्या जगाला
उंच बांधू गुढ्या तोरणे हेवा वाटेल जगाला !!
तरुणाईची शक्ती मोठी, हातात हात घेऊन येती
जग जिंकण्यास सारी एक दिलाने पुढेच जाती !!
हिमालयाची उंची ज्याची, अन गंगेची पवित्रता
या देशाला लाभली आहे अनेक धर्माची अखंडता !!
अनेक समाजसेवकांनी जन्म येथे घालवला
जन कल्याणासाठी जीव सारा ओतला !!
अनेक भाषांनी, विचारांनी देश समृद्ध झाला
एकीच्या भावनेने अखंड भारत माझा जोडला !!
असाच ठेवा देशाभिमान, अन करा मानव सेवा
तरच वाटेल समस्त दुनियेला फक्त तुमचा हेवा !!
-- बिपीन जगताप
Social Plugin