Type Here to Get Search Results !

गुंतता ह्र्दय हे ...!


गुंतून जाशील ...!





नको जास्त बोलू सखे गुंतून पुन्हा जाशील 
मागे फिरताना  अश्रू डोळ्यामध्ये येतील 
मनातले कप्पे तुझ्या सहज उलगडत जाशील  
आपलं माणूस म्हणून सगळ सांगत बसशील  !!

मन तुझ विचार करेल ह्रदयाला बोल म्हणेल 
तरीही काही बंधने तुला तोडायला भाग पाडेल
सखे त्यावेळी तुझा शब्द माझ्या ह्रदयात बसेल  
काळजाच्या घरात मग  मीच फक्त तुझ्या असेल !!

एक दिवस अचानक खोल वास्तव मग तुला दिसेल 
शब्दांशी खेळत सखे मग डोळ्यातील पाणी हसेल 
कशाला गुंतत गेलो डोक्यामध्ये घोळत राहील 
आठवणींचा हुंदका सखे गळ्यामध्ये दाटून येईल !! 

निरोपाच्या क्षणी मात्र समजेल खरे प्रेम आता कळले 
नकळत डोळ्यामध्ये कसे सगळे ह्र्दय द्रवून आले 
कशाला मग गुंतायचे प्रेमाच्या या सुखद जाळ्यात 
कशाला कोणी ठेवायचे ह्रदयाचे हिरव्या मळ्यात !!

निरोप घेताना सोड सखे मग हळूच हातातील  हात 
डोळ्यातील आसवांवर कर मग जाणीवपूर्वक मात
पुन्हा नको अशी ह्र्दय कुठे गुंतवत बसू 
देताना परत तुला आणावे लागते खोटे हसू  !!

-- बिपीन जगताप