'ती' शब्दातून डोकावते

हसऱ्या गोड शब्दातून डोकावते
मनाच्या आत घर करून राहते
ह्रदयाच्या कुपीत जाऊन लपते
'ती' कदाचित नसेलही तरीही असेल
गोड नावाने माझ्या मनात बसेल
तीचे रूप मनावर कोरले जाईल
न पाहताच डोळ्यात भरून राहील
'ती' कदाचित भावनांचा खेळ करेल
हसत खोटे बोलत आनंदाने रागवेल
पण तिच्या मनात मी थोडा वेळ असेल
कदाचित तिचे प्रेम भातुकली खेळेल
प्रेमाच्या चार शब्दांनी तिने सजावे
मनाच्या आत तिने डोकावून पहावे
कळत नकळत प्रेमात गुंतून जावे
ह्रदयाचे प्रेम ह्रदयाला अर्पण करावे
-- बिपीन जगताप
Social Plugin