सूर्य ज्योती उगवला
( क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १८५ व्या जयंती निम्मित ...पाळणा )

जनसामान्यांचा सूर्य उगवला
गोऱ्हे कुटुंबात ज्योती जन्माला
साऱ्यांना मोठा आनंद झाला
जो बाळा जो जो रे जो ...!
युगायुगांची प्रथा लय न्यारी
माणूस माणुसकीला हा मारी
त्यावर लढा जीवनभर दिला
जो बाळा जो जो रे जो .....!
माणसापेक्षा होता धर्म महान
जाती पातीची होती सारी घाण
त्यावर ज्योतिबा सूर्य कोपला
जो बाळा जो जो रे जो ....!
समाज हिताचे काम हे केले
जीवनभर सत्य शोधत राहिले
अस्पृश समाज जवळ केला
जो बाळा जो जो रे जो......!
स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली
बाईच्या हातात पाटी पेन्सिल दिली
स्त्रियांचा साऱ्या उद्धार केला
जो बाळा जो जो रे जो .....!
सावित्री बाईंनी साथ हि दिली
क्रांतीची त्यांनी मशाल पेटवली
उजेड दिन दलितांना दिला
जो बाळा जो जो रे जो......!
जीवनभर आनंदी फुले विकली
राष्ट्रात साऱ्या क्रांती हि झाली
'महात्मा' साऱ्या जनतेनी केला
जो बाळा जो जो रे जो .......!
-- बिपीन जगताप
Social Plugin